माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठाण चा वारकरी सेवा पुरस्कार जाहीर==15 सप्टेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरण==पंडित बापू आपेगावकर, ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे, ह भ प पंडित महाराज क्षीरसागर ह भ प वसंत महाराज यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण



जालना प्रतिनिधी समाधान खरात 
जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान मोरवड तालुका वडवणी जिल्हा बीड च्या वतीने स्व जगन्नाथ सिताराम शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ दिला जाणारा वारकरी सेवा पुरस्कार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना जाहीर करण्यात आला आहे
स्व जगन्नाथ सिताराम शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मनानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कीर्तन सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रकाश सोळंके यांच्या शुभहस्ते होणार आहे
या पुरस्काराचे वितरण दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी मोरवड ता वडवणी जिल्हा बीड येथे पंडित उद्धव बापू आपेगावकर, ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे हभप पंडित महाराज क्षीरसागर ह भ प वसंत महाराज यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा आ नरेंद्र पाटील यांची उपस्थिती असणार आहे
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी 1979 पासून राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत राजकारणात उंच झेप घेतली असून त्याबरोबरच समाजकार्य व धार्मिक कार्यात ते सदैव अग्रेसर राहिलेले आहेत लोणी गावचा सरपंच ते थेट मंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतलेली असून हे करीत असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी समाज कार्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहेत मुळात आमदार लोणीकर हे सर्वसाधारण वारकरी कुटुंबात जन्माला आले त्यांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय नाना लोणीकर हे नियमितपणे न चुकता आषाढी वारी करत असत हेच संस्कार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर असल्याने बालपणापासून त्यांना धार्मिक कार्यात रस असून, देहू जिल्हा पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह भ प श्री बोधले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या गाथा पारायण सोहळ्यामध्ये अन्नछत्र समितीमध्ये प्रमुख म्हणून त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानातून आलेल्या 5 लाख वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती हे करत असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व बब्रुवान शेंडगे यांनी अथक परिश्रम घेत पाच लाख वारकऱ्यांची भोजनाची उत्तम व चोख व्यवस्था केली होती 
1998 पासून धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून 1100 च्या वर गोरगरीब गरजवंत सर्वधर्मीय वधू-वरांचे विवाह लावून देण्याचे काम केले यामध्ये मनी मंगळसूत्र भांडी संसार उपयोगी साहित्य गादी पलंग आधी देऊन कन्यादान केले त्याचबरोबर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्यभरात पाणीपुरवठा खात्याला नव संजीवनी देत राज्यभरामध्ये 18000 गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना दिल्या त्याचबरोबर राज्यामध्ये 70 लाख शौचालय बांधून भारत देशामध्ये स्वच्छता अभियानामध्ये क्रमांक एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राला स्थान मिळवून दिले त्यांचीही उपलब्धी मोठी असून त्यामुळे त्यांना वारकरी सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रकाश जगन्नाथ शेंडगे, भारत जगन्नाथ शेंडगे संदिपान जगन्नाथ शेंडगे बब्रुवान जगन्नाथ शेंडगे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिली आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती