पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र सज्य,परतूर:पोलीस ठाण्यात पोलीस मित्रांना ड्रेसिंग चे वाटप


परतूर: प्रतिनीधी हनुमंत दंवडे
        येथील गणेश उत्सव व आगामी काळात येणारे उत्सव यादरम्यान, पोलीस प्रशासनाच्या मदतीला शंभर पोलीस मित्रांची टीम तयार करून त्यांना परतूर पोलीस स्टेशन च्या वतीने रविवारी(ता. ०४) रोजी टीशर्ट, कॅप व शिटीचे वाटप करण्यात आल्या
           या वेळी व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, शांतता कमिटी चे सदस्य डॉ संजय पुरी, उप प्राचार्य संभाजी तिडके, आदर्श शिक्षक रमाकांत बरीदे यांची प्रमुख उपस्थिती होती. परतूर उपविभागात असणारी पोलीस कर्मचारी अपुरी संख्या असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्त काळात मोठा तणाव निर्माण होत होता यावर पर्याय म्हणून पोलीस उप विभागीय अधिकारी राजू मोरे यांनी त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या मंठा, आष्टी, तळणी, मौजपुरी व परतूर या पोलीस स्टेशन मध्ये मिळून वयोगट 18 ते 30 दरम्यान असणाऱ्या 500 युवकांची पोलीस मित्र म्हणून नियुक्ती केली व त्यातच रविवारी रोजी परतूर येथे सर्व प्रथम 100 युवकांची पोलीस मित्र म्हणून नियुक्ती केली.
या वेळी बोलताना राजू मोरे म्हणाले की पोलीस मित्र च्या माध्यमातून युवकांना देशाची सेवा सह समाज कार्य करण्याची पण संधी मिळाली आहे. ती तुम्ही यशस्वी पार पाडावी असे सांगितले. 
यावेळी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले यांनी पण पोलीस मित्रांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलीस उप निरीक्षक नितीन गुट्टूवार, गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अभुरे, सह अनेक जण उपस्थित होते. 
                 कार्यक्रम चे सूत्रसंचालन योगेश बरीदे यांनी केले तर आभार अजय देसाई यांनी मानले.      



Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान