*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतूर येथील निवासस्थानी सहपरिवार गौरी पूजन करतांना आमदार बबनराव लोणीकर व परिवार,शेतकरी कष्टकरी सुखी-समृद्ध होऊ दे गौरी गणपती चरणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची प्रार्थना


प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतुर येथील निवासस्थानी आज गौरी पूजन करण्यात आले यावेळी लोणीकर परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र येत गौरी गणपतीचे विधिवत पूजन केले
      यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी परिवारासोबत गौरी गणपतीचा सण साजरा करताना शेतकरी कष्टकरी व्यापारी सुखी संपन्न होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना गौरी गणपतीकडे केली
आमदार बबनराव लोणीकर यांच्या घरी आलेल्या गौरीची सुंदर आरास युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केली असून गौरी गणपतीची अतिशय सुंदर कल्पकता वापरून बैलगाडीचे प्रतीक ठेवून ही आरास बळीराजा प्रति समर्पित केली असल्याची राहुल लोणीकर यांनी सांगितले
    गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने दरवर्षी लोणीकर परिवार एकत्रित हा सण साजरा करीत असतात राजकीय धावपळीतुन वेळ काढत आमदार लोणीकर व युमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर सण वार उत्सव एकत्रित येऊन साजरे करत असतात या वर्षी ही गौरी गणपती चा हा सण मोठया उत्साहात साजरा केला
यावेळी लोणीकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान