हेलस येथे गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
    शतकोत्तर गणेश उत्सवाची परंपरा असलेल्या श्री गणेश उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
     दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येत असून पर्यावरण पूरक, सर्व धर्मीय गणेश उत्सवाचे हे 134 वर्ष असून यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, तीन अंकी मराठी नाटकांचे प्रयोग, लळीत व त्यामध्ये अनिष्ट रूढी परंपरा वर प्रकाश टाकणारे सोंग त्यातून विडंबन, कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य शिबिर, रांगोळी स्पर्धा, भजन, भारुडे, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा श्री ची पालखी मिरवणूक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच पांडुरंग खराबे पाटील व श्री गणेश संस्थांचे अध्यक्ष दीपक खराबे पाटील यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात