कापकार मेडीकल च्या वतीने तळणी येथे जनावरांसाठी लम्पीस्कीन आजारावर मोफत लसीकरण

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
       ता.२१ ; मंठा तालुक्यातील तळणी येथे जनावरांसाठी लम्पीस्कीन आजारावर मोफत लसीकरण बुधवार ( ता.२१ ) रोजी कापकर मेडीकल तर्फे गढी जवळील परकोटात आयोजीत करण्यात आले होते.जनावरांच्या या आजारामुळे अनेक शेतकरी त्रस्त होते. या लसीकरण शिबिरात पाचशे जनावरांचे लसीकरण करण्यात आले.सामाजीक बांधीलकीचा वसा जपत सामाजीक कार्येकते गणेश कापकर यांनी जनावरांसाठी मोफत लसीकरण ठेवले होते. यावेळी डॉ. वासुदेव राठोड, डॉ.बी.जे.सरकटे, डॉ. संकेत खंदारे , डॉ.पवन आघाव, डॉ.विशाल मोरे शेतकरी ग्रामस्थ आदि ऊपस्थित होते. श्रीधर कापकर यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिली.

ग्रामीण भागातील जनावाराना लसीची व मनुष्यबळाची कमतरता असल्या कारणाने उपलब्ध असलेले सरकारी व खाजगी जनावारावर तळणी परिसरातील अन्य तीन ते चार डॉक्टराच्या सहाय्याने या श्रीधर कापकर व गणेशराव कापकर याच्या पूढाकाराने या पाचशे जनावाराना मोफत लसीकरण करण्यासाठी मोठी मदत झाली तसेच तळणी हे मोठे बाजाराचे गाव असल्याने जनावाराची सख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे सदरील लसीकरणासाठी गेल्या तीन दिवसापासून सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात जाहीरात केल्याने एकाच दीवसात मोठया प्रमाणात लसीकरण झाले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठीत मोठया प्रमाणात उपस्थीत होते भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष्य नितीन सरकटे याच्या हस्ते या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला 

सध्या जनावारावर येत असलेल्या लम्पी रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी जनावाराना मोफत लस दिली पाहीजे मुक्या प्राण्या प्रती आपले काही सामाजीक कर्तव्य असतात त्याची सेवा करून ते पार पाडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे गणेशराव कापकर यानी सांगीतले

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान