सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास पोलीस बांधव कटीबद्ध - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,सेवली येथील सुसज्ज पोलीस ठाणे इमारतीचे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. समाजातील दुर्जन शक्तीचा पराभव करण्यासाठी सज्जनशक्ती सक्रिय होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाने अतिशय उत्तमपणे आपले कार्य करावे,असे वाटत असेल तर समाजातील सर्व सज्जन शक्तीने देखील पोलीसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले

जालना तालुक्यातील सेवली येथे आयोजित पोलीस ठाणे लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे पोलीस उपाधीक्षक श्री राजू मोरे गणेशराव खवणे ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव पीएन यादव विकास पालवे डॉ.शरद पालवे कोमल कुचेरिया सरपंच नवीद शेख कार्यकारी अभियंता कांडलीकर पोलीस निरीक्षक कोठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या कुठल्याही सज्जन व्यक्तीला त्रास होणार नाही. मात्र येणाऱ्या योग्य व्यक्तीच्या तक्रारी दाखल करून त्याला योग्य न्याय दिला जाईल, याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी लोणीकर यांनी यावेळी केले. या ठिकाणच्या उत्तम अशा पोलिस ठाण्यांमध्ये उत्तम असे पोलिस प्रशासन दिसायला पाहिजे,असे निर्देशही लोणीकरांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिले. सर्वसामान्य निर्दोष जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलिसांनी तयार करून जनतेला दिलासा मिळवून द्यावा. नागरी सुरक्षेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन आदर्श, सुरक्षित व गतिमान अशी यंत्रणा या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून चालवावी असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील सरकारच्या काळात मंठा घनसावंगी व सेवली या तीनही पोलीस ठाण्यासाठी भरघोस असा निधी देवेंद्र फडणीस यांनी उपलब्ध करून दिला होता १ कोटी रुपयांची भव्य इमारत सेवली पोलीस ठाण्यासाठी देताना आपणास अत्याधिक आनंद होत असून देवेंद्र फडणवीस यांनी त्या काळात केलेली मदत आपण कदापि विसरू शकत नाही अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या इमारतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिल्याची माहिती यावेळी उपस्थित जनसमुदायाला दिली

यावेळी समाधान वाघमारे प्रमोद भालेकर महादेव बाहेकर गटविकास अधिकारी कराड बाबा आटोळे सार्वजनिक बांधकाम उपअभियंता नागरे सार्वजनिक बांधकाम उप अभियंता निवारे कंत्राटदार डेव्हिड घुमारे राजेभाऊ देशमुख गणेशराव खैरे श्रीराम राठोड संजय काळे सौरभ माहोरकर नंदू घोडे, बाबुराव शिंदे शिवराज तळेकर भास्कर ढाकणे सतीश सदावर्ते लक्ष्मण पवार परमेश्वर सोळंके अतुल देशपांडे रामदास ढाकणे गणेश मोरे गजानन महाजन फरहान अन्सारी अजीम पटेल दत्ता नरवडे, रमेश पवार, दिलीप बानाईत रामेश्वर काकडे दिगंबर जायभाये आसाराम पवार राजेश राठोड गजानन राठोड बाबासाहेब भागडे विशाल गीते किशोर चव्हाण माऊली क्षीरसागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि