मनसेचे काकडे यांना पाच जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
     जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरून जालना जिल्ह्यातून आपल्या मनसे स्टाईलच्या आंदोलनातून प्रशासनाला नियमित वेठीस धरून लोकांसाठी आवाज उठवत असल्याने याच माध्यमातून मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांच्या विरुद्ध काही राजकीय गुन्हे नोंद आहेत आसे सिद्धेश्वर काकडे यांनी काढलेल्या एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे
      पुढे पत्रकात सांगितले कि याच पाश्र्वभूमीवर सिद्धेश्वर काकडे यांनी भोंगा आंदोलन, मंठा वीज वितरण कार्यालय तोडफोड आंदोलन, मंठा गट विकास अधिकारी कार्यालय तोडफोड करून जालना जिल्ह्यात मनसे स्टाईल चांगलीच आक्रमक केली आहे. 
          सिद्धेश्वर काकडे यांच्या विरुद्ध आता पोलीस प्रशासनाने कार्यवाही करण्याचे नियोजन करत मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांच्या विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे यांच्या कार्यालयात जालना, बीड, औरंगाबद, परभणी, बुलढाणा, या पाच जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपारीची नोटीस काढली आहे. यावर काकडे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात DYSP यांच्या समोर हजर राहून जबाब देण्याचे आदेश होते. यावेळी मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजु मोरे यांच्या समोर हजर होऊन आपली बाजू मांडली आसल्याचे  शेवटी सिद्धेश्वर काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान