शिक्षकांचे पगार दिवाळीपूर्वी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी पूर्वी शिक्षकांचे वेतन करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांची दिवाळी गोड केली,विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न ही लवकरच मार्गी लागतील आमदार लोणीकर यांचा विश्वास,कार्यक्षम शिंदे फडणवीस सरकारमुळे शेतकरी सरकारी नोकरदार कामगार यांचे प्रश्न लागत आहेत मार्गी


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांच्या दिवाळी सणाच्या आनंदाला द्विगुणीत केले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे 
पुढे आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे क्रियाशील सरकार असून या सरकारच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी नोकरदार सोडवण्याचे काम प्रचंड वेगाने सुरू असून मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेला विकासाचा गाडा आता शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जोरदारपणे पुढे जात असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या पत्रकात नमूद केली आहे
शिक्षक पोलीस बांधव यांच्यासह नागरी सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका राज्यातील सरकारचे असून अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी राज्यातील सरकारची असल्याचे सांगतानाच ही जबाबदारी निश्चितपणाने पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी या पत्रकामध्ये नमूद केले आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपावली पूर्वी शिक्षकांना वेतन देण्याचे ठरवले असून राज्यातील शिक्षकांची दिवाळी यामुळे गोड होणार असल्याचे या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न लवकरच कसा सोडवता येईल यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून हा प्रश्न लवकरच निकाली निघणार असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या पत्रकात शेवटी म्हटले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती