कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी बाबासाहेब गाडगे यांची फेर नियुक्ती

परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
अखिल भारतीय कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे, व प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजु, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार एका पत्रकाद्वारे कोंगेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बाबासाहेब उद्धवराव गाडगे यांची नियुक्ती परतूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना अभिप्रेत असलेले पक्षकार्य सोबत घेऊन जोमाने करावे व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्तीबद्दल बाबासाहेब गाडगे यांचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, आमदार राजेश राठोड, अनवर देशमुख, नितिन जेथलिया,  माऊली तनपुरे, सुरेश सवने, हाजी साहब, इंद्रजीत घनवट, वैजनाथ बागल, प.स. सदस्य बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके, शेख शाकेर, बी.एन हिवाळे, राजेश भुजबळ, प्रमोद डुकरे, लक्ष्मण शिंदे, सचिन लिपणे, अविनाश शहाणे, सादेक जहागीरदार, मोसिन जमीनदार, विकास खुळे, गोपाल मरळ, सिद्धेश्वर अंभोरे, विष्णुपंत तनपुरे‌, आप्पासाहेब खंदारे, विकास झरेकर, नितिन शिंदे, चेतन नागरे, मनोज कराळे, पांडुरंग गाडगे, राहिमोद्दीन कुरेशी, तारेख सिद्धिकी, यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान