युवा वॉरियरच्या माध्यमातून २५ लाख युवकांना भारतीय जनता पार्टीचे जोडणार - भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,राहुल लोणीकर यांनी घेतलं कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन

प्रतिनिधी समाधान खरात
भारतीय जनता पार्टी प्रथम देश नंतर पक्ष व शेवटी स्वतः या भूमिकेतून काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या हेतूने पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो हीच राष्ट्रनिष्ठा व जनसेवेचा वसा सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचावा यासाठी युवा वॉरियर्सच्या माध्यमातून येणारी नवी पिढी भारतीय जनता पार्टीची जोडण्याचा संकल्प युवा मोर्चा ने केला असून आगामी काळात महाराष्ट्रातील २५ लाख युवकांना युवावर यशच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची जोडण्याचा संकल्प कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या साक्षीने केला असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सांगितले

भारतीय जनता पार्टी मध्ये समाविष्ट होणारा युवा वर्ग यांना भारतीय जनता पार्टीचा इतिहास व तत्कालीन काँग्रेसची सरकारने केलेले अन्याय अत्याचार माहीत असावेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची युवा वॉरियर ही मूळ संकल्पना असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी व भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात युवा वॉरियर्स भारतीय जनता पार्टी शी जोडले जाणार आहेत. तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर राहुल लोणीकर यांनी युवा मोर्चा ची बैठक देखील घेतली

या बैठकीला मार्गदर्शन करताना श्री लोणीकर यांनी स्पष्ट केले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ कसा पोहोचवता येईल याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक असून सर्वसामान्य पर्यंत योजना पोहोचविण्याचे आवाहन देखील लोणीकर यांनी यावेळी केले

प्रसंगी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या आगामी कार्यक्रमास संदर्भात देखील श्री राहुल लोणीकर यांनी उपस्थित अशी चर्चा केली तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या आगामी दौऱ्या संदर्भात देखील उपस्थित कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी धन्यवाद मोदीजी उपक्रमाबरोबरच नव मतदारांची नोंदणी अधिकाधिक करण्याबाबत राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली.

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर विक्रमसिंह देशमुख संतोष बोबडे इंद्रजीत देवकते आनंद कंजले दिनेश बागल कुलदीप भोसले सचिन लोंढे मकरंद पाटील प्रवीण घुले राजेश्‍वर कदम सलमान शेख ओम नाईकवाडे प्रीतम मुंडे राम चोपदार अविराम पाटील रोहित देशमुख प्रसाद मुंडे किशोर तिवारी अमोल पेठे शंकर मोरे सागर पाराडे धनराज नवले संजय नाना शितोळे (रिपाई) पांडुरंग पवार सचिन रसाळ विकास मलबा प्रसाद पानपुडे निलेश नाईकवडे ज्ञानेश्वर पडवळ रोहित देवकर राम छत्रे पुजारी खंडू छत्रे पुजारी यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती