मराठवाडा वॉटर ग्रीड कार्यान्वित करा या मागणीसाठी मराठवाड्यातील भाजपा आमदारांचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन,आघाडी सरकारने बासनात गुंडाळलेली मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा सुरू करून मराठवाड्यातील पाण्याची दुर्भिक्ष संपवा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,इस्राईल येथील मेकोरेट कंपनीने, अभ्यासपूर्ण मांडणी करत केला होता प्रकल्प अहवाल( डी पी आर) सादर,निवेदनावर आ हरिभाऊ बागडे, आ बबनराव लोणीकर, आ अभिमन्यू पवार यांच्यासह मराठवाड्यातील 17 आमदारांच्या स्वाक्षऱ्या

प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून संबोधली जाणारी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र व उद्योग धंद्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे काम पुन्हा सुरू करून योजना पूर्ण करून मराठवाड्याची दुष्काळ वाडा ही ओळख पुसून काढा अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देऊन केली 
    मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदरील निवेदन सादर करताना मराठवाड्यातील पाणी प्रश्नाची जाणीव करून देत आघाडी सरकारने बासनात गुंडाळलेली योजना कार्यान्वित करणे कसे गरजेचे आहे ही गोष्ट उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्यानात आणून दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये 2015 सालापासून सतत तीन वर्ष दुष्काळ पडला होता यादरम्यान मराठवाड्यामध्ये सुमारे चार हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करून मराठवाड्यातील जनतेची तहान भागवण्याचे काम करण्यात आले त्याचबरोबर लातूर शहर व जिल्ह्याला दुष्काळाच्या दहाकतेने इतके वेढले होते की त्यावेळी, लातूरला थेट रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता अगोदरच मराठवाड्याची ओळख ही दुष्काळ असणारा प्रदेश अशी असून या भागामधील सिंचनाचे क्षेत्र अतिशय कमी आहे त्याचबरोबर या ठिकाणी नागरी वस्त्यांना पिण्याचे पाणी जनावरांना पिण्याचे पाणी वैरणीचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी, उद्योग वाढीसाठी लागणारे पाणी मिळावे यासाठी इजराइलच्या तंत्रज्ञानावर आधारित मराठवाड्यासाठी वॉटर ग्रिड योजना आखण्यात आली होती यासंदर्भामध्ये तात्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आपण स्वतः व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया इजराइल श्रीलंका आदी देशांचा दौरा करून, मराठवाड्यासाठी इजराइल तंत्रज्ञानावर आधारित आदर्श व आशी वॉटर ग्रीड योजना आपल्या काळातच आपला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून मंजूर करण्यात आली होती औरंगाबाद जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली नांदेड या जिल्ह्यांचा सर्वे करून या संदर्भातला प्रकल्प अहवाल (डीपीआर) इजरायल येथील तंत्रज्ञ कंपनी मेकोरेट व पाणीपुरवठा विभागाने सादर केला होता योजनेचे कामाचा शुभारंभही होणार होता मात्र राज्यातील तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेतून गेले आणि आघाडीचे सरकार सत्तेत आले त्यामुळे विकास विरोधी सरकार सत्तेत आल्याच्या नंतर ही योजना बासनात गुंडाळण्याचे पाप तात्कालीन आघाडी सरकारने केले मात्र आता ही योजना आपली डबल इंजिन असणाऱ्या विकास प्रिय सरकारने हाती घेऊन मराठवाड्याची दुष्काळ वाडा ही ओळख पुसून काढण्यासाठी योजना कार्यान्वित करावी असे या निवेदनात मराठवाड्यातील आमदारांनी नमूद केले आहे
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनावर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार अभिमन्यू पवार,संभाजी पाटील निलंगेकर राणा जगजितसिंह पाटील, रत्नाकर गुट्टे मेघना बोर्डीकर ज्ञानराज चौगुले संतोष दानवे नारायण कुचे भीमराव केराम संतोष बांगर लक्ष्मण पवार तानाजी मुटकुळे यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती