पाडळी ग्रामपंचायत सरपंच सदस्याची बिनविरोध निवड,राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व.....
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तालुक्यातील पाडळी येथील ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच व सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. दि ७ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाच्या जागेवर एक उमेदवारी अर्ज आला तर सात सदस्य जागेवर सात उमेदवारी अर्ज राहिल्याने सर्वच सरपंच व सदस्य बिनविरोध निवड झाली आहे.
पाडळी येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच व सदस्याची बिनविरोध निवड झाल्याने सत्कार करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात आदि..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी यावेळी नवनिर्वाचित सरपंच प्रसाद नामदेव काकडे, सदस्य श्रीमती मीठाबाई शामराव काळे, श्रीमती सुष्मिता सचिन मस्के, श्रीमती योगिता अनंतराव मस्के, विष्णू भगवानराव बोराडे, श्रीमती महानंदा विष्णू कासार, श्रीमती राधाबाई शेषेराव मोटे, श्रीमती सावित्रा किसनराव काकडे या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पाडळी येथील नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment