आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री खिशाला पेन नसणारा 18 महिने घरात बसून राहणारा होता- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे=बावनकुळे यांच्यामुळे जिल्ह्यात विजेचे जाळे विनता आले- माजी मंत्री बबनराव लोणीकर=युवा मोर्चा ने चार लाख धन्यवाद मोदींच्या पत्रांचे संकलन केले युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर ,परतुर येथील भाजपा युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स मेळाव्यात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरांचा करण्यात आला नागरी सत्कार



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल करताना कधीही खिशाला पेन नसणारा मुख्यमंत्री व 18 महिने घरात बसून राहणारा मुख्यमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्याचा हा विक्रम इतिहासात नोंदवला जाईल अशा शब्दात टीका केली
ते परतुर येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा वॉरियर्स मेळाव्या प्रसंगी बोलत होते
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील बसवराज मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती
     पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारने विकासाची चाके थांबवली होती मात्र राज्यात भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार येताच सर्वसामान्य जनतेच्या कामांना विकास कामांना गती आल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले 
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाड्यासाठी भागीरथ ठरावी अशी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उद्योग व्यवसायाला पाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरता इजराइलच्या धर्तीवर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आखली होती मात्र आघाडी सरकारने ही योजना बासनात गुंडाळण्याचे पाप केले असल्याची टीका यावेळी बोलताना त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की हिवाळी अधिवेशनामध्ये मराठवाड्यातील आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन ही योजना पुनश्च सुरू करण्याची मागणी केलेली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली
यावेळी  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की तात्कालीन आघाडी सरकारची गत आंधळ दळतोय आणि कुत्र पीठ खाते अशा प्रकारची होती हे सांगतानाच तात्कालीन राज्य सरकारने मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष वाढवून ठेवल्याची टीकाही यावेळी त्यांनी बोलताना केली
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यासाठी दोन 220 केवी तर एकोणपन्नास 33 के व्ही दिले त्यांच्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये विजेचे जाळी निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो असे यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राज्यात सत्ता बदल होताच विकासाला पुन्हा एकदा गती आली असून राज्य सरकारच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक विकासाची कामे पुन्हा एकदा नव्या ताकतीने नव्या गतीने सुरू झाले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शिंदे फडणवीस सारखे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याला लाभले असून राज्याच्या विकासाचा गाडी  पुन्हा रुळावर आणण्यासाठी जोरदारपणे विकास कामांना प्रारंभ झाला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी नमूद केले
          यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर म्हणाले की जालना जिल्हा मध्ये छप्पन युवा वॉरिअरच्या शाखा उभ्या राहिल्या असून उर्वरित शाखांचा विस्तार लवकरच करण्यात येईल अटल युवा पर्व च्या माध्यमातून दिनांक 25  डिसेंबर म्हणजेच अटलजींच्या जयंती पासून 12 जानेवारी पर्यंत म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पत्रकारांचा सत्कार वक्तृत्व स्पर्धा स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन अटल दौड आदी कार्यक्रम युवकांसाठी राबवले असल्याचे या वेळी बोलताना त्यांनी सांगितले
=====================
*मोहनराव आढे यांचा शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश*
======================
पांगरी गोसावी जि प गटातील प्रभावी नेते म्हणून ओळख असणारे मोहनराव आढे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
======================
*युवा मेळाव्यात युवकांचा उत्साह बघण्यासारखा  लेंगी नृत्य, गोंधळी मंडळींचे उत्तम गायन भारतीय जनता पार्टीच्या व युवा मोर्चाच्या जोरदार घोषणा फेटे बांधून झेंडे नाचवणारे तरुण आधी गोष्टी नागरिकांना आकर्षित करून घेत होत्या या मेळाव्या दरम्यान अभूतपूर्व उत्साह बघायला मिळाला*
यावेळी गणेशराव खवणे रमेश महाराज वाघ संदीप गोरे रमेश भापकर सतीश निर्वळ प्रकाश टकले संजय तौर  पंजाब बोराडे हरिराम माने अशोकराव बरकुले माऊली शेजुळ संभाजीर खंदारे जिजाबाई जाधव अंकुश बोबडे राजेश मोरे नागेश घारे, रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात  रामेश्वर तनपुरे दिगंबर मुजमुले अर्जुन राठोड दत्ता कांगणे शिवाजी पाईकराव महेश पवार राजेश म्हस्के दिलीप पवार अशोक डोके युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस नरसिंग राठोड संभाजी खंदारे किशोर हनवते भाजपा परतुर शहराध्यक्ष गणेश पवार मंठा शहराध्यक्ष प्रसाद बोराडे नगरसेवक संदीप बाहेकर सुधाकर सातोनकर प्रकाश चव्हाण कृष्णा अरगडे संपत टकले शत्रुघ्न कणसे गजानन उफाड विक्रम उफाड विकास पालवे तुकाराम सोळंके सिद्धेश्वर सोळंके रोहन आकात ज्ञानेश्वर वायाळ गजानन लोणीकर सुधाकर बेरगुडे रमेश आढाव,  रवी सोळंके बंडू मानवतकर विलास घोडके विवेक काकडे नितीन सरकटे जितेंद्र सरकटे माऊली गोंडगे, शहाजी राक्षे संभाजी वारे राजेंद्र वायाळ नरेश कांबळे शुभम आढे रमेश राठोड सिताराम राठोड अनंता वैद्य तुकाराम वैद्य आनंद जाधव यांच्यासह हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती