सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकता आणि राष्ट्रभक्तिची भावना वाढण्यास मदत – आ. लोणीकर,परतूर पत्रकार समन्वय समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
  सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृति संवर्धनाचे कार्य केले जाते. अनेक वर्षांपासूनचा सांस्कृतिक ठेवा एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे काम अशा कार्यक्रमांमधून केले जाते. लोकांमध्ये राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचे काम सांस्कृतिक कार्यक्रम करत असल्याचे मत माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले आहे. 
      प्रजासत्ताक दिनानिमित्त परतूर पत्रकार समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक आ. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. माजी आ. सुरेशकुमार जेथलिया,बाळसाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मोहनकुमार अग्रवाल, एसडीएम भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, डीवायएसपी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड, युवा सेना समन्वयक महेश नळगे, विजय नाना राखे, एकनाथ दहिवाळ, प्रकाश चव्हाण, इजरान कुरेशी, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

        प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मधली काही वर्ष हा कार्यक्रम बंद पडला होता, पत्रकार समन्वय समितीने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यंदापासून सुरू केल्या बद्दल आ. लोणीकरांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डॉ. शेषराव वायाळ, अध्यक्ष आशिष गारकर, योगेश बरीदे, शामसुंदर चित्तोडा, रशीद बागवान, कैलास सोळके, संतराम आखाडे, राहुल मुजमूले यांच्याहस्ते आ. लोणीकरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.   

       परतूर शहरातील सर्वच शाळा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात एकूण ३० संघ सहभागी झाले होते. प्राथमिक गटातून मौलाना अली जोहर उर्दू प्राथमिक शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक तर विवेकानंद पब्लिक स्कूल आणि ज्ञानलता पब्लिक स्कूलच्या संघाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.योगानंद प्राथमिक शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. माध्यमिक गटात विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या संघाने प्रथम तर योगानंद माध्यमिक विद्यालय आणि विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या संघाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविले. लाल बहादुर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने मध्यमिक गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

           मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व पत्रकार बाधवांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण