परतूर येथील येथे वीज कर्मचारी संपावर


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतूर येथील महावितरण कंपनी मधील सर्व कर्मचारी अधिकारी वीज खाजगीकरणच्या विरोधात आज पासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत
             अदानी इलेक्ट्रिक कंपनीच्या वतीने भांडुप परिमंडळा मधील ठाणे व वाशी मंडळातील महावितरण कंपनीच्या क्षेत्रातील भागासाठी खाजगी वीज वितरण परवाना मिळावा यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. यास महावितरण कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसेच बाह्य कंत्राटी कामगार यांना कायम करण्यात यावे यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे
       या संपामध्ये वीज कर्मचारी अधिकारी अभियंते बाह्य कंत्राटी कामगार तसेच संघटनाचे पदाधिकारी एन. व्ही बेंडाळे, रमेश आढाव, जी ए चंदेल,पी एस गणेर, आर डी वायाळ, गुलाम यासीन,सुभाष कांबळे, नौशाद काजी वा वाहेद काजी इतर महिला कर्मचारी तसेच सर्व विजकर्मचारी अभियंता अधिकारी बाह्यकंत्राटी कामगार संपूर्ण संपामध्ये सहभागी झालेले आहेत.....

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान