दैठणा खुर्द अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उदंड प्रतिसाद,हभप रुपालीताई सवने महाराज यांच्या संगीत भागवत कथेला जनसमुदाय उसळला परतूर कैलाश चव्हाण 
     तालूक्यातील दैठणा खुर्द येथे ब्रम्हनिष्ठ गंगा भारती महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि . १३ जानेवारी ते २० जानेवारी करण्यात आलेले आहे . या अखंड नाम सप्ताहासोबत सुप्रसिध्द किर्तनकार हभप रुपालीताई रामेश्वर सवने महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचेही आयोजन केल्याने या सोहळ्याला आणखी झळाळी प्राप्त झालेली आहे. भाविकभक्तांचा मोठा प्रतिसाद भागवत कथेला मिळत आहे. 
 या कीर्तन सोहळ्यात दि . १७ जानेवारी रोजी हभप . ज्ञाने्श्वर महाराज सेलूदकर भोकरदन , दि १८ जानेवारी रोजी किर्तन केशरी पांडुरंग महाराज उगले पाथरी , १९ जानेवारी रोजी हभप शिवा महाराज बावस्कर बुलढाणा यांचे किर्तनाचा लाभ रात्री ९ ते ११ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मोरश्श्वर संस्थान दैठणा खुर्द यांच्याकडुन करण्यात आले आहे. तसेच प्रख्यात सुप्रसिद्ध किर्तनकार हभप रुपालीताई सवने महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे आयोजन दररोज सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत करण्यात आलेले आहे . याचाही हजारो भाविक भक्त महिला कथा श्रवनचा आनंद घेत आहेत. दि . २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हभप संतोष महाराज अढावने भोकरदन यांचे काल्याचे किर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.  या सप्ताहाचा कीर्तन व कथा श्रवनांचा जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असेही आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील भव्य दिव्य अशा या अखंड हरिनाम सप्ताहाला तालूक्यातील राजकीय मान्यवरांनीही आपली उपस्थिती लावलेली आहे. 

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि