दैठना खुर्दच्या सरकारी विहीरीवरचा पाईप कापून नुकसान

 परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
तालुक्यातील दैठना खुर्द येथील गावाला पाणीपुरवठा करणार्‍या सरकारी विहिरीवरील मोटरचा पाइप कापून नुकसान केल्या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच सुनिल तायडे यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि १४ जानेवारी रोजी २०२३ रोजी ग्रामपंचायत ग्रामपंचायत मार्फत गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून नुकसान केले आहे. तसेच दुसर्‍यांदा दि. २० जानेवारी रोजी रात्री ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनचा मोटारचा पाईप कुणीतरी अज्ञाताने पाईप कापुन विहीरीत टाकुन देऊन दहा हजार रुपयाचे नुकसान केले आहे. या प्रकरणी सरपंच सुनिल तायडे यांच्या फिर्‍यादीवरुण दि २१ जानेवारी रोजी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात