जालना अंबड बदनापूर मतदारसंघातील 326 गावांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत योजनेसाठीचा प्रस्तावनागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू करण्याची केली होती मागणी



प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील 271 गावच्या वॉटर ग्रीड वर आधारित पायलट प्रोजेक्ट अंतर्गत जालना अंबड बदनापूर मतदारसंघातील मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत 326 गावांसाठीचा प्रस्ताव मागवण्यात आला असून येणाऱ्या काळामध्ये या योजने संदर्भातील प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल ,वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत कामा साठी असून या योजनेच्या माध्यमातून या भागातील जनतेला येणाऱ्या काळामध्ये शुद्ध फिल्टर पिण्याचे पाणी उपलब्ध होईल
या संदर्भामध्ये तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी इजराइल ऑस्ट्रेलिया श्रीलंका आदी देशात भेटी देऊन इजराइल तंत्रज्ञानावर आधारित परतूर मंठा नेर शेवली विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुक्रमे 271 गावची वॉटर ग्रीड योजना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून तात्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आखली होती ही योजना अतिशय यशस्वी ठरत असून आज घडीला 271 गावच्या वाटर ग्रीड मधील 150 च्या वर गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा केला जातो तर उर्वरित गावच्या वॉटर ग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या दोन महिन्यांमध्ये या पायलेट प्रोजेक्टमध्ये साकारण्यात आलेल्या वॉटर ग्रीड योजनेचे पाणी संपूर्ण गावांपर्यंत पोहोचेल वीज बिलाचा खर्च वाचवण्यासाठी परतूर मंठा योजनेच्या वीज पुरवठ्यासाठी सोलर सिस्टिम सुमारे 50 एकर जमिनीवर बसवण्याचे काम सद्यस्थितीत चालू आहे त्याचबरोबर ही योजना कॉम्प्युटराईज्ड असून अतिशय कमी मनुष्यबळावर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी एक संयुक्त वॉटर ग्रीड योजना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आखली होती मात्र राज्यातील फडणवीस सरकार सत्तेतून पायउतार झाले आणि महाविकास आघाडीचे राज्यात सरकार सत्तेवर आले या सरकारने मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वकांक्षा असलेला पाणीपुरवठा योजनेचा विषय दुर्लक्षित करून ही योजना बंद केली मात्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत येताच गत हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाड्यातील आमदाराच्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते 
या पार्श्वभूमीवर या योजनेला टप्प्याटप्प्याने कार्यरत करण्याची राज्य सरकारची योजना असून पहिल्या टप्प्यामध्ये अंबड जालना बदनापूर तालुक्यातील 326 गावांसाठी च्या योजनेचा प्रस्तव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या योजनेच्या माध्यमातून या तिन्ही तालुक्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे या योजनेच्या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी हा मुद्दा लावून धरला होता
परवा वाटुर तालुका परतुर येथे दस्तुरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या संदर्भामध्ये सूतोवाच केले होते यावेळी बोलताना त्यांनी लोणीकरांनी केलेला पाठपुरावा या ठिकाणी उपस्थिता समोर मांडला होता
या योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात आता झाली असून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे हे यश मिळाले आहे
    नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते व ही योजना सुरू करण्याची मागणी केली होती या निवेदनावर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे अभिमन्यू प्रशांत बंब रत्नाकर गुट्टे लक्ष्मण पवार सुरेश धस पवार तुषार राठोड राजेश पवार नारायण कुचे संतोष दानवे आदींसह 18 आमदारांच्या सह्या होत्या
आमदारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या पाठपुराव्यामुळेच योजना सुरू करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा सध्या अंबड जालना बदनापूर तालुक्यामध्ये आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती