परतूर शहराच्या विकासासाठी भाजपाला येत्या पालिका निवडणुकीत संधी द्या-मा.मंत्री आ. बबनराव लोणीकर यांचे परतूर शहरातील नागरिकांना आवाहन,पालिकेची सत्ता हाती दिल्यास 500 कोटीचा निधी आणून अधिक वेगाने विकास कामे करू


प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष करा संपूर्ण सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती द्या परतूरच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी आणतो असे आश्वासन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर शहरातील नागरिकांना दिले
ते परतुर शहरातील ताराराणी मळा व माने मळा येथे संपन्न झालेल्या 40 लक्ष रुपयांच्या रस्ते बांधकामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते 

पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गेल्यावेळी थोडक्यात विजयाने हुलकावणी दिली मात्र यावेळी जनता आपण केलेल्या 350 कोटी रुपयांच्या विकास कामाला कौल देईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला
राज्यात मतदार संघात काँग्रेस भुई सपाट झालेली आहे तिला परतूर शहरात भुई सपाट करा अशी यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले
    आपण प्रत्येक निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली असून राजकारणाच्या सुरुवातीपासून समाजसेवेचा वसाहती घेऊन काम करत आलो असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले सामाजिक बांधिलकी जपत 1100 मुलींचे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपण केली असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले या सामुहिक विवाह सोहळ्या दरम्यान मनी मंगळसूत्र, गादी ,पलंग, भांडीकुंडी आधी वस्तू देऊन कन्यादान केले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
   परतूर शहरात विकास करीत असताना 32 कोटी रुपयांची रस्ते बांधणी आपण केली राज्यातील आघाडी सरकार जाउन सत्ता बदल होताच आपण परतूर शहरासाठी 05 कोटी रुपयांचा निधी आणला येत्या दोन ते चार दिवसांमध्ये परतुर शहरासाठी आणखी 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल असे यावेळी बोलताना त्यांनी उपस्थितना सांगितले
शहरातील रेल्वे लाईन वरील उड्डाणपुलासाठी 50 कोटी रुपये भूमिगत गटार योजना 45 कोटी, असेल नाट्यगृह 17 कोटी असेल न्यायालय इमारत 14 कोटी असेल क्रीडा संकुल 15 कोटी असेल मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह 10 कोटी असेल असे एक ना अनेक कामे शहरात केली असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे डॉक्टर संजय पुरी भाजपा शहराध्यक्ष गणेश पवार सुधाकर सातोनकर, संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण ओम मोर कृष्णा आरगडे पत्रकार लक्ष्मीकांत राऊत संपत टकले शत्रुघ्न कणसे बालाजी सांगोळे,प्रमोद राठोड सोनू अग्रवाल, ज्ञानेश्वर जईद नरेश कांबळे, अमोल अग्रवाल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती