कार्यक्षम मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा,जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाने उपक्रम राबवीले

 परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
 
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा परतूर तालुक्यात जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने तालुक्यात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला .
यामध्ये आदर्श प्राथमिक शाळा परतुर , जिल्हा परिषद शाळा डोल्हारा , जिल्हा परिषद शाळा श्रीष्टी , जिल्हा परिषद शाळा वलखेड ,जिल्हा परिषद शाळा मापेगाव, जिल्हा परिषद शाळा वरफळ जि.प.शाळा व वरफळवाडी येथे
 एकाच वेळी सर्व शाळेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. श्रीष्टी येथील वर्धिनी रुग्णालय येथे रुग्णास फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
 लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय मोंढा परतुर येथे प्राथमिक विद्यालय मोंढा परतुर येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली
 विषय माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र प्रथम:- शिवम तुळशीराम धानोरे द्वितीय:- धनंजय शिवाजी मुळे 
तृतीय :-भावेश रामेश्वर देशमुख व         
            अबुजर शलील शेख यांना पारितोषिक देण्यात आले, योगानंद माध्यमिक विद्यालय परतुर येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यामधील विषय:- माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र
प्रथम :- वैष्णवी सोळंके वर्ग नववी द्वितीय :- साक्षी गणगे वर्ग नववी तृतीय :- सारंगदेवी महेंद्रसिंग व तन्मयी बोर्डे तसेच स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय परतुर येथे 
 विषय:-माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र
प्रथम :- जयकुमार कपिल काटे 
द्वितीय :- कृष्णा बाळू देशमुख
 तृतीय :- समर्थ लक्ष्मण काटे
प्रत्येकी रोख रक्कम स्वरूपात पारितोषिके बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या हस्ते देण्यात आले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, युवा सेना तालुकाप्रमुख अविनाश कापसे, शहर प्रमुख दीपक हिवाळे, सरपंच दिनकर शेंडगे , तालुका संघटक विजयकुमार गीरी ,अल्पसंख्याक तालुकाप्रमुख शेख खाजा शेख चांद, उपतालुकाप्रमुख राजेभाऊ मुळे,महीला आघाडी तालुका प्रमुख निता धोंगडे, वैद्यकीय सेवा कक्षाचे शिवाजी तरवटे ,दत्ताभाऊ अंभोरे ,अंगद खरात , विष्णु जगाताप , बळीराम वाघमारे,गजानन आकात ,सोनू डोल्हारकर, सोपान कातारे मधुकर निलेवाड व आदी बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले..

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण