तळणी : सेवाध्वजाच्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हा . उध्दवराव पवार


तळणी : प्रतिनिधी रवी पाटील 
   जगदगुरू संत श्री सेवालाल महाराज पावन स्पर्शाने पूणीत झालेल्या पोहरादेवी येथे येत्या १२ फेब्रवारी होणाऱ्या या कार्यक्मास हजारो च्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हाहन सामाजीक कार्यकर्त्य उद्धवराव पवार यानी तळणी येथे केले बंजारा समाजाची व सपूर्ण सनातन धर्माची काशी म्हणून परीचीत असलेल्या पोहरादेवी येथे महाराष्ट्र शासनाकडून ५३९ कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमीपूजन मूख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमूख्यमंत्री देवेद्र फडणवीस पोहरादेवीचे मंहत बाबूसीह महाराज यांच्या प्रमुख उपस्थीत विविध विकास कामाचे भूमीपूजन व सेवाध्वज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
या कार्यक्रमासाठी प पू सेवालाल महाराज याचे देशभरातून लाखो अनुयाई या निमित्य पोहरा देवी येथे येणार आहेत तसेच सपूर्ण देशभरातील सांधू संत मठाधिपती याची उपस्थिती सुध्दा यावेळी असणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्य राष्ट्रसंत डॉ रामराव बापू महाराज यांचा जयजय कार होणार असून संपूर्ण बंजारा समाजाचे धर्मपीठाचे पिठाधीश्वर प पू बाबूसिग महाराज याच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे नेते व मंत्री संजय राठोड आमदार निलेश भाऊ नाईक कर्नाटकचे मंत्री प्रभूजी चव्हाण तूषार राठोड आमदार राजेश भैया राठोड आमदार इद्रनिल नाईक उध्दवराराव पवार अविनाश चव्हाण धर्म प्रचारक किसनभाऊ राठोड डॉ मोहन चव्हाण बि डी चव्हाण विनोद चव्हाण याच्या प्रयत्नातून या सेवा ध्वज कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले 

सेवालाल महाराज याच्या पावनभूमीचा मोठया प्रमाणात विकास झाला पाहीजे त्या हेतूने ५३९ कोटी रुपयांचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे याचा मोठा उत्साह बजारां समाजामध्ये आहे हा आंनद द्विगूनित .करण्यासाठी या कार्यक्रमासाठी सर्व बंजारा समाज बांधवांनी हजर राहण्याचे आव्हाहन उद्धवराव पवार यानी केले आहे 


चौकट
सेवाध्वज कार्यक्रमासाठी राज्यांचे मुख्यमंञी एकनाथ शिदे उपमुख्यम त्री देवेद्र फडणवीस सह महाराष्ट्र राज्यातील व परराज्यातील मंञी खासदार आमदार पदाधीकारी उपस्थीत राहनार आहे संजय राठोड यांच्या नेतूत्वाखाली समाजाच्या अनेक समस्याबद्दल निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी सर्वपक्षीय विचार बाजूला ठेऊन धर्माच्या ध्वजाखाली एकञ येणार आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान