छत्रपतींचा, साधुसंतांचा अपमान सहन केला जाणार नाही - आमदार लोणीकर,साधू संतांविषयी विधान करताना तारतम्य बाळगा.. अन्यथा गंभीर परिणाम - आमदार लोणीकर,संत गजानन महाराजांच्या कृपेने दिंडी मार्ग पूर्ण होऊ शकला- माजी मंत्री, आमदार लोणीकर


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
       महाराष्ट्र व देशभरातून कष्टकरी शेतकरी कामगार डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक नेते कार्यकर्ते आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे याकरिता एक महिनाभर दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालतात. जगभरात असा दिंडी सोहळा कुठेही नाही. जालना जिल्ह्यात संत गजानन महाराजांच्या दिंडीला पंढरपूरहून शेगाव कडे परत जाताना अपघात झाला होता. या अपघातात वारकऱ्यांचे मृत्यू झाले होते. जालना जिल्ह्याला हा काळा डाग लागला होता. संत गजानन महाराजांना आपल्या भाविक भक्तांची काळजी असल्याने संत गजानन महाराजांच्या कृपेने मला मंत्री पदाची संधी मिळाली त्यामुळे माझ्याकडून चारशे किलोमीटरचा शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग पूर्ण होऊ शकला. असे प्रतिपादन परमार्थ आश्रम सोयंजना तालुका परतुर जिल्हा जालना येथे संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भाकड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या सोहळ्यात मराठवाडा वॉटर ग्रीड योजने चे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री बबनराव लोणीकर साहेब यांनी केले.
राजकीय नेते आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर चुकीचे विधान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना, छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी बोलताना भान ठेवून विधान केली पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचे नेते असो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमच्या कुठल्याही साधू संतांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही. असे बोलताना नाव न घेता सुषमा अंधारे यांना म्हशीची उपमा देऊन जितेंद्र आव्हाड यांना रेड्याची उपमा देत खरपूस समाचार घेतला. 
या प्रसंगी ह भ प श्रीनिवास महाराज बद्री भाऊ ढवळे शत्रगुण कणसे संपत टकले ज्ञानेश्वर माऊली सुरेश सोळंके ओम मोर सेठ विष्णू ढवळे विष्णुकांत शास्त्री सोळंके आनंदे महाराज रामराव महाराज ढवळे विनायक महाराज अबुज नरहरी निचळ शिवलिंग महाराज मोरे तुळशीदास सोळंके रामकिसन राऊत महादेव महाराज सुरूंग अनिल ढवळे सरपंच सोनू ढवळे केशव ढवळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती