मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करावे- अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ,आमदार लोणीकरांनी मंत्रीपदाच्या काळात केलेले काम मोठे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
मुख्यमंत्री व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करावे, या ठिकाणाहून जाताना नागरिकांनी आपल्या चिंता विसरून गाव समृद्धीच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवावे असे आवाहन यावेळी बोलताना अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले ते वाटुर फाटा ता परतुर येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या आर्ट ऑफ लिविंग च्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार संजय शिरसाठ माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर कार्यक्रमाचे संयोजक पुरुषोत्तम वायाळ यांची उपस्थिती होती
    पुढे बोलताना आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर म्हणाले की स्वच्छता अभियानाची सुरुवात जालना जिल्ह्यातून झाली होती आणि देशभरामध्ये हे अभियान यशस्वीपणे राबवले गेले होते तशीच आज जलतारा या पाणीदार गाव करण्याच्या मोहिमेचे ही यशस्वी लोन संपूर्ण भारतभरात पसरेल व या जलताराच्या माध्यमातून देशभरातील अनेक गावे पाणीदार होत समृद्ध होतील असा आशावाद यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला
यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये, तात्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री असताना महाराष्ट्रातील सरकारने इजराइलच्या तंत्रज्ञानावर आधारित मराठवाडा वॉटर ग्रीड ची रचना केली होती या माध्यमातून शेतीला पाणी पिण्याचे पाणी व उद्योगांना पाणी उपलब्ध होणार होते मराठवाड्यातील बारा नद्यांना एकत्रित जोडून या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होणार होते मात्र आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर अतिशय महत्त्वाची महत्त्वकांक्षी योजना आघाडी सरकारने भाषणात गुंडाळी होती असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
    पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आमदार लोणीकर मंत्री असताना राज्य सरकारने राबवलेली जलयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याचे काम तात्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले, जलतारा माध्यमातून अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याच्या या पावन भूमीमध्ये गावांना पाणीदार करण्याची मोहीम आर्ट ऑफ लिविंग ने हाती घेतली असून या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची यावेळी त्यांनी सांगितले
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सी एस आर फंडाच्या माध्यमातून मोठे जलक्रांती या राज्यामध्ये उभी राहिली असून राज्य सरकार जलयुक्त शिवार टप्पा दोन च्या माध्यमातून जलक्रांती करण्यासाठी वचनबद्ध असल्याची त्यांनी यावेळी सांगितले
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जलसंधारण हे खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांतीकडे मार्ग असून आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून मंठा तालुक्यातील 50 गावे गेल्या वर्षी पाणीदार करण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले
या कार्यक्रमाला मतदारसंघासह मराठवाड्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण