परतूर येथील रेल्वे लाईनच्या उडान पुलाच्या कामाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण,येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सत्ता द्या शहरातील संपूर्ण विकास कामे करून दाखवू



प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आपण विकास कामांमध्ये कधीही राजकारण आणले नाही त्यामुळे मतदारसंघाचा समतोल विकास करू शकलो असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली ते परतुर येथे रेल्वे लाईन उडानपुलाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की
परतूर शहराच्या विकासासाठी आपण 350 कोटी रुपयांचा निधी आपण दिला त्या माध्यमातून परतुर शहरातील नाट्यगृह अंतर्गत रस्ते उडान पूल भूमिगत गटार शहरातील पाणीपुरवठा योजना, गणपती मार्ग स्वर्गीय मुलींचे वस्तीग्रह, यासह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की जालना जिल्ह्यामध्ये खाली चिरडून 14 वारकऱ्यांचा विदारक अंत झाला होता या गोष्टीचा शल्य मनाला पोहोचणारा होता हा देण्यासाठी खऱ्या अर्थाने काळा डाग होता मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन वारकऱ्यांसाठी सुसज्ज मार्ग तयार करील असे साकडे घातले होते पांडुरंग आणि संत गजानन महाराजांच्या कृपेने माझ्या मंत्रीपदाच्या काळामध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग करू शकलो अशी यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार लोणीकर म्हणाले की आपल्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा आणि भेडसावणारा प्रश्न हा पाणी होता पिण्याच्या पाण्याअभावी दरवर्षी शेकडो टँकर मतदार संघात फिरत होते मात्र पाणीपुरवठा विभागाचा भर माझ्या खांद्यावर असताना मी इजराइल ऑस्ट्रेलिया श्रीलंका आदी देशात भेटी देऊन, परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील तीनशे गाव साठी स्वतंत्र राशी एकत्रित वॉटर ग्रीड निर्माण केली या वॉटर गडीच्या माध्यमातून सध्या परिस्थितीमध्ये दीडशे च्या वर गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा या ग्रिड मुळे अतिशय कमी मनुष्यबळाचा वापर ग्रेड मार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी होतो ए ग्रेड अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेली असून संगणकावरील बटन दाबताच गावाला पाणी सोडता येते असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
   येणाऱ्या काळात नगरपालिकेची सत्ता परतुर शहरातील नागरिकांनी आमच्या हाती दिल्यास निश्चितपणाने परतुर शहरासाठी 500 कोटीचा निधी आणल्याशिवाय राहणार नाही तर असून ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी परतूर शहरातील नागरिकांनी एकदा जबाबदारी द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना केले
पुढे बोलताना ते म्हणाले की मतदारसंघांमध्ये 4700 कोटीची विकास कामे करत असताना दोनशे गावामध्ये डांबरीकरणाचे रस्ते बांधले अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते घरकुल 200 च्या वर गावांमध्ये सभामंडप अंगणवाडी बांधकाम शाळा खोल्या बांधकाम यासह अनेक विकास कामे करण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
    यावेळी कार्यक्रमाला बाळासाहेबाची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम भगवानराव मोरे भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर हरिराम माने रंगनाथ येवले दिनेश कुमार होलानी बद्रीनारायण ढवळे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले दया काटे नगरसेवक सुधाकर सातोनकर, संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे संपत टकले शत्रुघ्न कणसे, पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले रामेश्वर तनपुरे शिवाजी पाईकराव तुकाराम सोळंके तालुकाप्रमुख अमोल सुरुंग ओम मोर सुधाकर बेरगुडे, राजेंद्र मुंदडा संतोष हिवाळे बालाजी सांगोळे, शहाजी राक्षे शिवाजीराव तरवटे दीपक हिवाळे शेख खाजा अविनाश कापसे सोनू अग्रवाल ज्ञानेश्वर जइद, नरेश कांबळे अमोल अग्रवाल अमर बगडिया मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी शेख नदीम, वसंत भापकर वसंत राजबिंडे दत्ता धुमाळ तिच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती