रस्ते बांधणीच्या माध्यमातून जनसामान्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,लोणीकरांच्या हस्ते जालना तालुक्यात १३ कोटी ५० लाख रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन


 
प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतुर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांड्याला डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याने जोडून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
जालना तालुक्यातील चितळी पुतळी, नेर व सेवली येथील १३ कोटी ५० लक्ष रुपयाच्या डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चितळी पुतळी फाटा ते शेवगा गावापर्यंत नळकांडी पुलासह डांबरीकरण रस्ता ३.७०० किमी (४५० लक्ष रुपये), नेर गाव ते ढगी गावापर्यंत नळकांडी पुलासह डांबरीकरण रस्ता ८.७०० किमी (६०० लक्ष रुपये), सेवली गाव ते भागडे सावरगाव नळकांडी पुलासह डांबरीकरण रस्ता (२०० लक्ष रु), सावरगाव भागडे चौफुली ते सेवली गाव नळकांडी पुलासह रस्ता डांबरीकरण (१०० लक्ष रु) कामाचे उद्घाटन आज श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक गावाच्या विकासासाठी रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून डांबरीकरण्याच्या रस्त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही मतदारसंघात आपण गेलो तर परतुर विधानसभा मतदारसंघ सारखे दर्जेदार रस्ते कुठेही नाहीत असा दावा देखील यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला.

नेर येथे मंजूर असलेल्या १३२ केव्ही होते त्या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील झाले होते परंतु तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांनी येथील १३२ केवी पळवून दुसरीकडे नेले त्या ठिकाणी स्वतः ऊर्जामंत्री असताना ३३ केव्ही भूमिपूजन केले होते परंतु त्यांना ते करता आले नाही मात्र मंजूर असलेले १३२ केव्ही पळवले. याप्रकरणी ग्रामस्थांनी दक्ष राहून आंदोलन करणे किंवा संबंधित १३२ केव्ही न हलवण्याबाबत आक्रमक पवित्र घेणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही याची खंत असून नव्याने त्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेही श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

परतूर विधानसभा मतदारसंघातील वॉटर ग्रीड, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, २०० पेक्षा अधिक गावांना डांबरीकरणाचे रस्ते, १०० पेक्षा अधिक गावांना सभामंडप, गावांतर्गत सिमेंट रस्ते यासह विविध विकास कामांच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आपण केले आहे. मागील पंचवार्षिक मध्ये मंत्री पदाच्या कार्यकाळात आपण परतुर विधानसभा मतदारसंघातील विकासाचा पूर्ण अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला असून अजूनही मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
==========================
*सेवली येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी*
सेवली येथे बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली संतोष सेवालाल महाराज यांचे विचार प्रत्येक तिने आचरणात आणावेत साधुसंतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
===========================
यावेळी मंचावर भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ, भारतीय जनता पार्टीचे जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाशराव टकले, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलासराव शेळके भाजयुमो उपाध्यक्ष गजानन उफाड, विकास पालवे, जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष विक्रम उफाड, पंचायत समिती सदस्य अशोक डोके, कोमल कुचेरिया, समाधान वाघमारे, प्रमोद भालेकर, शिवराज तळेकर,डॉ.रियाज, हनुमंतराव उफाड चिंतामण नाना उफाड नारायण मगर विलास भुतेकर संदीप भुतेकर संजय भालेराव अशोक पवार पिराजी गायकवाड दिलीप जोशी गणेशराव खैरे गजानन महाजन आजम पटेल आसाराम खरात प्रभाकर गाढवे गजानन राठोड बाबासाहेब भागडे विशाल गीते फरहान अन्सारी दिलीप पवार राजेश राठोड नंदकुमार घोडे समाधान वाघमारे प्रमोद भालेकर आदेश खाबिया परमेश्वर सोळंके माऊली क्षीरसागर पुंजाराम टकले दत्ता नरवडे रामेश्वर काकडे सोपानराव गाडेकर जालिंदर राठोड विनोद राठोड संदीप राठोड विजय घाडगे राजू पवार अशोक थाबडे गणेश मोरे संजय काळे माऊली क्षीरसागर सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री निवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती