पोहरागड तीर्थक्षेत्र विकास कामाच्या भूमिपूजनाचे साथीदार व्हा -अर्जुन राठोड

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
 12 फेबुवारी रोजी विविध मान्यवर उपस्थितमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारुड पुतळ्याचे अनावरण तथा विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेले तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पार पडणार आहे. त्यामुळे बंजारा समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहून पोहरागड तीर्थक्षेत्र विकास कामाच्या भूमिपूजनाचे साक्षीदार व्हा. असे आवाहन बंजारा ब्रिगेड चे महाराष्ट्र संघटक ,  सेवा भूमीचे अध्यक्ष व श्रीष्टी तांडा सरपंच अर्जुन  राठोड यांनी केले आहे.
   बंजारा समाजातील अगणित नागरिक विविध राजकीय पक्षामधील विविध पदावर कार्यरत आहे शिवाय समाजाच्या उन्नतीसाठी अनेक होतकरू युवक युवती व समाज सेवक काम करीत आहेत
. भारतात बंजारा समाजात हा भारतात विविध प्रांतात विविध राज्य मध्य वेग वेगळ्य वर्गवारी मध्य विखरलेला असून जवळपास 15 कोटी
या समाजाची लोकसंख्या आहे. मात्र मुलभूत सुविधा पासून अध्याप पर्यंत बंजारा समाज विकास पासून आजही  दूर आहे

या सर्वांचे उद्दिष्ट म्हणजे समाजाचा विकास होय. त्यामुळे त्यामुळे पक्षभेद गट तट ,संघटना ,विसरून सर्वांनी. एक बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन सेवाध्वज कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन अर्जुन राठोड यांनी केले आहे.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत