श्रावनबाळाचा आदर्श समोर ठेवुन आई वडिलांची सेवा करा - रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज ,परतुरची आयोध्यानगरी भक्तीरसात दुमदूमली



परतुर - प्रतिनिधी कैलाश चव्हाण 

प्रत्येक सत्कार्य करायला भाग्य लागते त्यातल्या त्यात आई वडिलांची सेवा हि जगाज सर्वात भाग्याची संधी असुन श्रावनबाळाचा आदर्श समोर ठेवुन आई वडिलांची सेवा करावी अशी भवनीक साद रामायनाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी भक्तांना घातली. जेथलिया परिवाराच्या वतिने आयोजीत रामकथेच्या आजच्या दुस-या दिवशी आयोध्या नगरीत गर्दी करत भक्तांचा जनसागर उसळला होता. आज दिनांक 9 फेब्रुवारी रामकथेच्या दुस-या भागात रामजन्म उत्सव साजरा करण्यात आली.
श्री.रामकथेतिल रामकथेचा प्रसंग प्रात्याक्षीकात दर्शवत उपदेश स्थळी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात राम बाळाला झोका देतांना भक्त मंत्रमुग्न होतांना दिसला. आई वडिलानां कुटुंबात सार्वत मोठे स्थान असते हे आपण पुर्वजापासुन पाहत आलो आहे. श्रावण बाळाने तर आपल्या अंध मात्या पित्याला खांद्यावर कावड मध्ये देवदर्शन घडवले, म्हणुन आजही त्याचा मातृ पित्र प्रेमाला कुणीचं विसरले नाही , आजची पिढीने पण हया बाबी आत्मसात करणे गरजेच्या असल्याचे सांगत त्यांनी राम कथेतुन राम जन्माचे अनेक प्रसंग आपल्या ओजस्वी वाणीतुन व्यक्त केले. पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप वाढले एका नव्या आवताराने जन्म घेतला श्री.रामचंद्रराने आपल्याला हाच संदेष दिला असुन संयम, विवके व धर्म जागृतता आपल्या मनातील कधीचं भटकू देवु नका , व नितीमत्ता कधीच सोडु नका तरचं या जिवनाचे खरे फलित ठरेल असा संदेश ह.भ.प ढोक महाराज यांनी आज दिला.

दरम्यान कथेच्या सुरवातीला जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. यात मा.आ.सुरेशकुमार जेथलिया व विमलताई जेथलिया तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी उध्दव जिजा गाडगे, बाबुरावजी धस,अभिजीत काळे,सखाराम महाराज गवळी, पुरशोत्तम षालीग्राम, बि.डी.पवार, लक्ष्मण तेलगड, संदिप नळगे, भोसले सर, ज्ञानेश्वर अंभुरे, अबासाहेब कदम, सखाराम दिक्षीत , शंकरराव पवार, गणेश कुलकर्णी, मनोहरराव तनपुरे, पंडितराव सुरूंग, उध्दवराव घारे, ज्ञानोबा माउली पवार, बालाप्रसाद पोरवाल, विश्णुपंत सुरूंग, बाबुराव कवडे, श्रीरंगराव सुरूंग, दत्ता दवडे, गंगाधरराव सुरूंग, भगवानरााव मोटे, सीताराम काकडे, अषोक बोर्डे , ज्ञानोबा बरकुले, संपत खालापुरे, मनोहर खालापुरे, मुरलीधर देषमुख, भागवत मोरे, दया काटे आदीची उपस्तीती होती.

दरम्यान सांयकाळी याच ठिकाणी ह.भ.प. प्रकाष महाराज साठे यांचे किर्तन पार पडले यावेळी मोठया संखेने महिला पुरुष भक्तांची उपस्थीती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती