नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन,परतूर विधानसभा मतदारसंघातील आष्टी सातोना वाटुर सेवली पांगरी गोसावी तळणी या ठिकाणच्या खरेदी केंद्रांना तात्काळ मान्यता द्याआमदार बबनराव लोणीकर यांची मागणी
 प्रतिनिधी समाधान खरात 
सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू असून अवकाळी पावसाची दाट शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी पाऊसही झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे नाफेडणे त्वरित खरेदी केंद्रांना मान्यता द्यावी असा लक्षवेधी प्रश्न माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर विधानसभे मध्ये उपस्थित केला
   यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की सध्या अवकाळीचे चावट असून काही ठिकाणी गारपीट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हरभऱ्याची खळे करून घेण्यात गुंग आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा त्यांना त्वरित बाजारपेठेत विकण्यासाठी नाफेडणे आपले खरेदी केंद्र सुरू करावेत असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
नाफेड व्यवस्थापक हे फारसे याबाबतीत गंभीर नसून त्यांनी तात्काळ खरेदी केंद्रांना मान्यता देणे गरजेचे आहे माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघातील आष्टी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी जवळपास 60 गावांचे शेतकरी आपले धान्य वितरित करीत असतात तर सातोना हेही बाजारपेठेचे गाव असून येथे परतुर कृषी उत्पन्न बाजार समिती ची उप बाजारपेठ आहे सातोना या ठिकाणी जवळपास 20 गावातील शेतकरी धान्य विक्री करत असतात तर वाटुर फाटा तालुका परतुर येथेही परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार पेठ असून या ठिकाणीही जवळपास 20 ते 25 गावचे शेतकरी धान्य विक्री करत असतात असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की मंठा तालुक्यामधील पांगरी गोसावी सर्कल व खोराड सावंगी सर्कल मधील काही भागातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर पांगरी गोसावी या ठिकाणी धान्य विक्रीसाठी आणत असतात त्यामुळे तेथेही नाफेड खरेदी केंद्राची आवश्यकता आहे, तर तळणी तालुका मंठा येथेही मोठ्या प्रमाणावर जवळपास जयपुर सर्कलचा काही भाग खोराड सावंगी सर्कलचा काही भाग या भागातील शेतकरी आपले धान्य विक्री करीत असतात या ठिकाणी नाफेड खरेदी केंद्राची आवश्यकता आहे त्याचबरोबर जालना तालुक्यातील शेवली या बाजारपेठेमध्ये जवळपास 30 ते 40 गावांचा संपर्क असून या ठिकाणी शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी बाजारात आणत असतात या ठिकाणीही नाफेड केंद्र सुरू करण्याची आवश्यकता असून या सर्व केंद्रांना मंजुरी देण्यासाठी व्यवस्थापकांनी कुठलीही दिरंगाई न करता तात्काळ मंजुरी द्यावी असे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
====================
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याविषयी केले निवेदन सादर
नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात जाऊन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भेट घेत मतदार संघातील सर्वच्या सर्व नाफेड खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याच्या सूचना नाफेड व्यवस्थापकांना द्याव्यात अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण