आशा डे कार्यक्रम परतूर येथे संपन्न,आरोग्य सेवेसारखं पुण्य या जगात दुसरं काही नाही - सौ मंदाताई बबनराव लोणीकर

 
 
  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     आशा स्वयंसेविका केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः ग्रामीण पातळीवर आरोग्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका Accredited Social Health Activist म्हणून गावातील स्थानिक महिलांची नेमणूक केली. आशा स्वयंसेविकां महत्वपूर्ण आरोग्य सामाजिक दुवा म्हणून राज्यात कार्य पार पाडत असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील The National Rural Health Mission शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याची कामगिरी आशा स्वयंसेविका बजावत असतात. 
   यांच्या चांगल्या व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व राज्यस्तरावर सन्मान केला जातो. असा च आशा डे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परतूर अंतर्गत आशा डे ग्रामीण रुग्णालय परतूर येथे आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. बबनराव लोणीकर साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ मंदाताई बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आशा स्वयंसेविका यांची रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा व तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविका यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला या वेळी त्या बोलत होत्या.
 पुढे बोलताना सौ मंदाताई लोणीकर म्हणाल्या की 
आरोग्य सेवा करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करत असताना आपलेपणाची भावना रुग्णा प्रति जोपासावी आशा सेविका आरोग्याचा कणा असून आरोग्य सेवे सारखं पुण्य या जगात दुसर नसल्यामुळे आशा सेविकांना हे पुण्य कमावण्याची संधी प्राप्त झाली असल्याने राज्यातील सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
                या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नागदरवाड . DCM पुणेवाड मॅडम बरकुले मॅडम .डॉ ठाकूर सर . डॉ नवल डॉ डाके सर डॉ पांढरपोटे डॉ मोरे डॉ तारे डॉ वाघमारे श्री सोमंथा येव्हारे मदने मॅडम सर्व गटप्रववर्तक , व आशा सेविका उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती