परतुर विधानसभा मतदार संघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 112 नवीन जलकुंभास मंजूरी,माजीमंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रयत्न यशस्वी

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून परतूर विधानसभा मतदार संघात 120 गावात नवीन जलकुंभ बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. 
    173 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना व 95 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या गावांकरिता फिल्टर पाण्याची योजना प्रस्तावित आमदार बबनराव लोणीकर यांनी सतत पाठपुरावा केल्याने दोन्ही ग्रीड योजनेमध्ये समाविष्ट नसलेली परतुर तालुक्यातील 24 गावे योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे तसेच 173 गावे ग्रीड योजनेतील 11 गावांची व 95 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेतील 12 गावांची कामे जिल्हा परिषद मार्फत करण्यात येणार होती त्या कामांचा समावेश देखील 120 गावे योजनेत करण्यात आला आहे तसेच पुनर्वसनातील पाच गावे व ज्या गावांमध्ये जल जीवन मिशनच्या निर्देशाप्रमाणे जलकुंभाची क्षमता कमी पडते अशा 68 गावांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत 36.13 किलोमीटर लांबी उधर्वावाहिनी 170.64 किलोमीटर लांबीची पाणीपुरवठा पाईपलाईन 109 जलकुंभ व तीन मुख्य जल कुंभ असून 173.12 किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था आहे. यात मंठा तालुक्यातील एरंडेश्वर शिवणगिरी वाई जयपुर आरडा तोलाजी ब्रह्मणात तांडा देवठाणा तांडा गुलखंड तांडा लावणी तांडा मोसा तांडा वाटुर तांडा कानफुडी तांडा श्रीराम तांडा पांगरी गोसावी धोंडी पिंपळगाव पोखरी टकले बेलोरा तांडा बेलोरा वझर सरकटे दहिफळ खंदारे देवठाणा उसवद हेलस माळेगाव शिरपूर तळणी डेंगे वडगाव खोराडसावंगी किनखेड माळतोंडी मुरूमखेडा पांगरी बुद्रुक टोकवाडी टोकवाडी तांडा विर्गवन तांडा गेवराईकरणावर रानमळा शंकरनगर वांजोळा जामखेडा सावरगाव वायाळ हिवरखेड तांडा पिंपळखेड खराबी अंभोरा शेळके दहा देवगाव खवणे कारटेकी तांडा हनुमंत खेडा केहाळ वडगाव किल्ला तिर्थापुर तांडा मोहदरी माळकिनी तळतोंडी उमरखेडा हिवरखेडा लिंबोना जांभरुण हातवन केदार वाकडी मंगरूळ वैजोडा या 62 गावात तर परतूर तालुक्यातील अकोली आनंदवाडी आसनगाव बाबई ढोकमळ तांडा डोलारा हस्तुर तांडा खांडवी वाडी मापेगाव पाटोदा माव सातोना बुद्रुक शिंगोना सिरसगाव वरफळ होंडेगावं वलखेडा श्रीधर जवळा रोहिना खुर्द आंबा आनंदगाव अंगलगाव चांगतपुरी चिंचोली, दैठणा खुर्द गोळेगाव गोळेगाव कराळा कोकाटे हादगाव ( 2 जलकुंभ ) कोरेगाव लिंगचा मापेगाव खुर्द परतवाडी पिंपळी धामणगाव संकनपुरी वाहेगाव सातारा या सदोतीस गावात तर जालना तालुक्यातील बोरगाव एरंडवडगाव मोहाडी नेर सावरगाव भागडे शेवली उखळी शिवनगर ढगी शंभू सावरगाव या दहा या गावांचा समावेश आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती