समर्थ नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
      नेहरू युवा केंद्र व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ नगर येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात अली साजरी. 
   यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली व प्रमुख पाहुणे समर्थ नगर चे नगरसेवक श्री.संदीप खरात व ऍड.रीमा खरात यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनाबद्दल महत्व पटवून सांगितले यावेळी तक्षशिला बुद्धविहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे,संबोधी ड इंगोले, प्रा.राजकुमार म्हस्के, युवा संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, अजय हिवाळे, विशाल वाघमारे, किरण दाभाडे, आनंद वाघमारे, सौरभ जाधव, शुभम गायकवाड, अजय ढवळे, सुधीर खंडारे, संदिप इंगोले, अशोक गंगावणे, सर्जेराव शरणागत, माया रत्नपारखे संगिता गंगावणे, मिनाबाई शरणागत, शोभाबाई खरात, चंद्रकांत वाघमारे, डॉ. सुशील सूर्यवंशी, प्रशिक खंडारे, प्रणाली खंडारे इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान