मेहकर दरेगाव जालना बस पूर्वत करा अन्यथा आंदोलन- मनसे

सिंदखेडराजा प्रतीनीधी समाधान सरकटे
मेहकर येथून ग्रामीण भागातून धावत जाणारी जालना ही बस सेवा काही दिवसा अगोदर चालू होती. परंतु अचानक बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांचे हाल होत आहे .
    मराठवाड्याला जोडणारा जालना हे मोठे शहर असून तेथे मोठी बाजारपेठ आहे. या शहरापर्यंत ही बस धावत होती. अनेक व्यापारी या बसने प्रवास करत पंरतु ही बस बंद करण्यात आली असल्याने अनेकांचे हाल होत आहे. ही बस पूर्ववत करावी अशी मागणी मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडे वारंवार करण्यात आली. पंरतु आता जर बस पूर्ववत करण्यात नाही आली तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व मेहकर आगारातून एकही बस बाहेर न पडू देण्याचा इशारा निवेदनात नमूद केला असून निवेदनावर मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. अशी माहिती मनसे प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे याांनी दिली आहे.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान