मनुष्याचा विचार हा सकारात्मक असला पाहीजे - आनंद चैतन्य बापू

तळणी प्रतिनिधी रवी पाटिल दि 7 एप्रिल 
   आजचा गीता रामायण सत्संगाचा दुसरा दिवस चितंन मनुष्याच्या जिवनात फक्त भगवंताचे होऊ शकते परतू सांसारीक मनुष्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त चितांच आहे पांडवाच्या आयुष्यातील चितां ही भगवताला ज्ञात होती अर्जुनाच्या ह्दयात भगवंत श्रीकृष्णाचा वास होता म्हणून तो अधिकार प्राप्त होता पांडवांना देवाचा आशीर्वाद होता अनेक वेळा पांडवावर संकटे आली परतूं पांडवांची निती ही स्वच्छ पाण्यासाखी होती म्हणून भगवान कृष्णा ने त्याना साथ दिली मनुष्याने सुधा त्याच्या आयुष्यात नितीने वागले पाहीजे मनुष्याचा विचार हा सकारात्मक असला पाहीजे प्रत्येकाच्या जीवनात निराशा आहे त्या निराशेची चिंता करू नका त्या निराशेला खबीरपणे सामोरे जा त्या कृष्णा वर विश्वास ठेवा तोच आपल्याला साथ देईल त्या साठीच साधनेचा सत्संग आपल्या आयुष्यात असने गरजेचे आहे 
मनुष्याने सांसरीक आयुष्यात अशा सदगारू कडे गेले पाहीजे जो की आपल्याला आधार वाटला पाहीजे आपले दुःख आपल्या भावना त्याला समजल्या पाहीजे गुरूचा वावर मनुष्याच्या जिवनातील मोठा आधार असतो गुरूच पाठबळ आपल्याला तारण्यासाठीच असते फक्त त्याला जोड आपल्या भक्तीची असने गरजेचे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे संत श्री ज्ञानेश्वर संत श्री तुकोबाराय याच्या पावन स्पर्शाने पूनीत झालेली आहे त्यानी या जगाला भक्तीचा मार्ग दिला आहे त्यानी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केलाय खूप मोठा सघर्ष केलाय आज त्याच ज्ञानोबा तुकोबाच्या नावाने 
हजारो किर्तनकार कथाकार त्याचा विचार संबध जगतात पोहचवण्याचे काम साधक किर्तनकार प्रवचनकार करत आहे 

मनुष्याने प्रत्येकावर प्रेम केले पाहीजे कारण परमात्मा हा सर्व व्यापक आहे तो व्याप्त आहे आपण एकमेकावर प्रेम केले पाहीजे तरच तो भगवंत आपल्यावर प्रेम करेल त्याने बनवलेल्या या सुष्ट्रीत तो कणाकणात व्याप्त आहे तो आपल्याला समजत नसला तरी आपण केलेली भक्ती आपण त्याच्या प्रती व्यक्त केलेली भावना नक्कीच त्याला कळती त्यासाठी त्याला मोठया श्रद्धेने आपण आळवने गरजेचे आहे 

संत ज्ञानेश्वर संत तुकाराम छञपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज झाशीची राणी महाराणा प्रताप विर सावरकर संत सेवालाल संत बहीणाबाई महाराज अशा अने महात्माने आपल्यासाठी खूप त्याग केलाय कोण काय म्हणतय याचा विचार करु नका आपल्याला विचार या संतांनी दिलाय त्याच्या विचारावर सध्या चालण्याची गरज आहे तरच आपण आपली वैचारीक क्षमता व आपले आदर्श सिध्द करु शकूत आपण आपल्याला विचारांना आपल्या क्रांतीकारक आदर्शना . त्याच्या विचाराच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे आव्हाहनच आपल्या पूढे आहे सनातन धर्मावर अनेक संकटे आहेत त्याना विचाराच्या शस्त्रानेच सरळ करावे लागेल आपल्या सगळ्याचे मुळ हा सनातन धर्म आहे संत ज्ञानेश्वर सत तुकाराम छञपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज महारणा प्रताप हे आपले सनातन धर्माचे मुळच आहेत त्यानी दिलेला विचारच आपल्यासाठी शिरसावद्य आहे तो विचार आपला आदर्श असलाच पाहीजे

इंजि.प्रा माधवभाऊ चव्हाण यांच्या माध्यमातुन या भव्य दिव्य गीता रामायण सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या या सत्संगाची सांगता होणार आहे या साठी महाराष्ट्र  मंत्री संजय राठोड जालना जिल्हयाचे पालकमंञी अतुलजी सावे याची उपस्थीती असणार आहे उद्याच्या सत्सगांचा महाप्रादाचा लाभ घेण्याचे आव्हाहन इंजि माधव भाऊ चव्हाण यानी केले आहे 

कथा प्रवक्ते आनंद चैतन्य बापू

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार