महादेवाचा जगात कोणी शञू नाही प्रभू श्रीराम सुध्दा महादेवाचे पूजक होते आणि रावण सुध्दा महादेवाचा भक्त त्या महादेवा ला आपण शरण गेले तर तो नक्कीच प्रसाद मिळेल-ह भ प महेश महाराज महाजन

तळणी  प्रतिनिधी रवी पाटील 
साधू असे पर्यन्त त्या साधूची किमंत समाजाला समजत नाही साधू तत्व आहे म्हणून या पृथ्वीतलाचा सांभाळ आहे ज्या दिवशी साधूचा वरदहस्त नसेल त्या दिवशी पूथ्वीवर विनाश होईल मनुष्याला मनुष्यात बसवण्याचे काम हे साधूने केले आहे शिवमहापूराणाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ह भ प महेश महाराज यानी प्रातिपादन केले 
शिवमहापूराण एक तत्व आहे मनश्चक्र जर शांत ठेवायचे असेल शिव महापूराणाशिवाय पर्याय नाही मनुष्याचे मंन खूप चंचल आहे ते सैरभैर आहे देवाला आपण फूल जरी अर्पण करत असू त्यापेक्षा देवाला आपण मन दिले तरी तर त्याला अन्य काही देण्याची गरज नाही ज्या दिवशी आपण भंगवंताला मन देऊत त्याच दिवशी आपले मनश्चक्र शांत झाल्याशिवाय राहणार शास्त्राच्या विरहीत ज्याच जिवन आहे ते जिवन होऊ शकत ज्याच्या वृत्तीत विकार आहे त्याने देवाला कितीही आळवले तरी त्याचा उपयोग नाही शास्त्राच्या आधारे वेदाच्या आधारे जो जीवन व्यथीत करतो तोच खरा धर्माभिमानी मनुष्य हा बाह्यअंगाने जरी सुंदर असला तो अंतररंगाने मात्र तो काळा आहे शबरीचे अंतकरण शुद्ध होते म्हणुन प्रभू राम तिच्या कडे गेले ज्याला अतरंग शुध्द करायचे असेल तर त्याने शिव महापूराणाच्या सत्संगाचा आधार घेतलाच पाहीजे तरच तो शुध्द होईल 
मनुष्यानी दुसर्या साठी जगले पाहीजे तेच भंगवताला प्रिय असते साधूचे जग ने हे समाजासाठी असते म्हणून त्याचे अस्तीत्व असते साधूच्या अस्तीत्वावर मनुष्याचे अस्तीत्व टिकून आहे ज्या घरामध्ये साधूचा वावर नाही साधूचे पूजन नाही ते घर निशाचर समजावे साधूचा लोकांतामध्ये सुध्दा एकांत असतो काम क्रोध मोह माया मश्चर यांचा ज्याला स्पर्श नाही तो साधू मनुष्याला एक वेळ सत्संग नाही झाला तरी चालेल पण कुत्संगती व्हायला नको कुत्सगांती झाली तर मनुष्य जिवनाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही संगतीचा आधार हा चांगला असेल तर जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनुष्याने शिवमहापूराणाची संगत धरावी तरच त्याचे जीवन सफल होईल गाईच्या शेणात राहणाऱ्या किडयाचा जर चांगल्या संगतीने उध्दार होऊ शकतो तर मनुष्याचा का होणार नाही मनुष्याच्या पूण्याचा उदय आल्याशिवाय त्याचा उध्दार होणे नाही
हे मुत्युलोक आपल्याला सगळा हिशोब याच ठिकाणी देऊन जायचे आहे त्यामुळे पापाच्या संचया पेक्षा पूण्याचा संचय जास्त असला पाहीजे परमार्थ करण्यासाठी मनुष्याची व्रती बदली पाहीजे चंचूला च्या त्यागाने तिच्या भक्तीने व्यभिचारी पत्नीचा सुध्दा उध्दार करुन घेतला पिशाच्च यौनीला गेलेला तिचा पत्नी चंचुले ने भक्ती च्या जोरावर परत मिळवला भक्ती मनुष्य जिवनाच्या उध्दाराचे साधन आहे ते साधन आपल्याला फुकट मिळाले आहे ती करा तरच आपला या कलयुगात टिकाव लागेल
ज्या महादेवाचा जगात कोणी शञू नाही प्रभू श्रीराम सुध्दा महादेवाचे पूजक होते आणि रावण सुध्दा महादेवाचा भक्त त्या महादेवा ला आपण शरण गेले तर तो नक्कीच प्रसाद दिल्याशिवाय राहणार भोलेनाथ हा अजात शञू आहे ज्याचे की कोणाशीच वैर नाही तो भोळा महादेव आपल्या सगळ्याचा उध्दार केल्याशिवाय राहणार नाही स्वःत चा उद्धार करुन घ्यायचा असेल शिवमहापूराणाचा आधार हा घ्यावाच लागेल तरच आपण या पृथ्वीतलावर आल्याचे सार्थक होईल
आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्‍या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्य प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा; पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्यही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी, इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो, की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी ? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती