मनुष्याच्या व्यवहारात बदल होण्यासाठी परमार्थाचा परिचय होणे आवश्यक-ह भ प महेश महाराज महाजन

तळणी -प्रतिनिधी रवी पाटील
   मनुष्याच्या व्यवहारात बदल होण्यासाठी परमार्थाचा परिचय होणे आवश्यक आहे देह जावो अथवा राहो ही भावना येणे म्हणजेच आपला परमार्थ योग्य दिशेने आहे ज्याचा त्याला परमार्थ करू द्या शेजारच्या ने एखादे व्रत केले तर ते आपण करावेच असे नाही आरसा आहे ते स्वरूप दाखवत असतो ज्या वेळी आपण आपल्या चेहर्याची स्थीती आरश्यात बघतो त्याच वेळी मनुष्याने आपल्या मनाची परिस्थीती काय आहे ते बघीतले पाहीजे आरसा जशी मनुष्याची परिस्थीती दाखवतो तशीच शिवकथा ही आपली स्थीती प्रत्येकाला दाखवतच असते ज्याला महादेवला प्रसन्न करायचे आहे त्याला श्रवण भक्ती करणे गरजेचे आहे श्रवणाचे तीन भाग आहेत मनन चितन आणि आचरण श्रवण भक्ती ही इतरांना सागीतली पाहीजे तळणी येथे श्री संत नेमीनाथ महाराज यांच्या ७० व्या पूण्यतिथी निमित्य चालू असलेल्या शिवमहापूराणाच्या तिसऱ्या दिवशीचे पुष्प ह भ प महेश महाराज महाजन यांनी गुंफले 

चौकट
[मनुष्याने अतकरणापासुन भक्ती केली पाहीजे श्रवण भक्ती मनुष्याच्या उध्दाराचे साधन आहे शिवाने सुधां सागितले जो माझे श्रवण करेल त्याला मि प्रसन्न होईल सर्व जो कोणी तिर्थक्षेञावर कथा साधना करतो त्याला अधिक पट्टीने पूण्य मिळते विलास भोगण्यासाठी तीर्थक्षेञ नसतात तीर्थक्षेञावर गेल्यावर ही मानसे स्वैरचेर वागत आहे हे समाज सुधारण्याचे लक्षण नसून समाज बिघडल्याचे लक्ष्यन आहे तिर्थक्षेत्राचे पावीत्र्य प्रत्येकाने जपले पाहीजे स्वच्छता ठेवली पाहीजे केदारनाथ सारख्या घटने पासून आपण कधी बोध घेणार तीर्थक्षेञ हे आपल्या धर्माची प्रतीके आहेत ती जीवंत ठेवणे आपल्या हातात आहे ]






संगतीचा आधार हा चांगला असेल तर
 जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनुष्याने शिवमहापूराणाची संगत धरावी तरच त्याचे जीवन सफल होईल गाईच्या शेणात राहणाऱ्या किडयाचा जर चांगल्या संगतीने उध्दार होऊ शकतो तर मनुष्याचा का होणार नाही मनुष्याच्या पूण्याचा उदय आल्याशिवाय त्याचा उध्दार होणे नाही
हे मुत्युलोक आपल्याला सगळा हिशोब याच ठिकाणी देऊन जायचे आहे त्यामुळे पापाच्या संचया पेक्षा पूण्याचा संचय जास्त असला पाहीजे परमार्थ करण्यासाठी मनुष्याची व्रती बदली पाहीजे चंचूला च्या त्यागाने तिच्या भक्तीने व्यभिचारी पत्नीचा सुध्दा उध्दार करुन घेतला पिशाच्च यौनीला गेलेला तिचा पत्नी चंचुले ने भक्ती च्या जोरावर परत मिळवला भक्ती मनुष्य जिवनाच्या उध्दाराचे साधन आहे ते साधन आपल्याला फुकट मिळाले आहे ती करा तरच आपला या कलयुगात टिकाव लागेल

ज्या महादेवाचा जगात कोणी शञू नाही प्रभू श्रीराम सुध्दा महादेवाचे पूजक होते आणि रावण सुध्दा महादेवाचा भक्त त्या महादेवा ला आपण शरण गेले तर तो नक्कीच प्रसाद दिल्याशिवाय राहणार भोलेनाथ हा अजात शञू आहे ज्याचे की कोणाशीच वैर नाही तो भोळा महादेव आपल्या सगळ्याचा उध्दार केल्याशिवाय राहणार नाही स्वःत चा उद्धार करुन घ्यायचा असेल शिवमहापूराणाचा आधार हा घ्यावाच लागेल तरच आपण या पृथ्वीतलावर आल्याचे सार्थक होईल

आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्‍या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा; पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्यही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी, इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो, की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी ? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.

प्रत्येक कार्यात नामचितन केले पाहीजे 
रामनाम हे उध्दाराचे साधन आहे कामामध्ये रामनाम हे घेतले तर मनुष्याचे दुःख संपेल सुखाची प्राप्ती होईल प्रत्येक क्षण भगवंताचे नामस्मरणात गेला ,तर तो एक संस्कार होईल आणि नामस्मरणाचा जर संस्कार मनुष्यावर झाला त्या संस्काराची परपंरा झाल्याशिवाय राहणार नाही 

या शिवमहापूराणाच्या निमीत्य तळणी ग्रामस्थासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ श्रवण करत आहे श्री संत नेमीनाथ महाराज संस्थानचे पदाधीकारी ग्रामस्थ व वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी या साठी परीश्रम घेत आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती