लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत झाला पाहिजे - राजेश भालेराव, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांना मदत करण्यासाठी पुढे आली -- जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे

 

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, बळकटी करण्यासाठी ज्या मूल्यांवर, ज्या स्तंभावर लोकशाही उभी आहे ते सर्व स्तंभ मजबूत असायला हवेत. विशेषतः लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाणारी प्रसार माध्यमे अधिक बळकट व्हायला हवीत. 
  या माध्यमातून लोकशाही अधिक प्रभावीपणे रुजायला हवी असे मत व्हॉईस ऑफ मिडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजेश भालेराव यांनी व्यक्त केले आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परतूर तालुक्यातील पत्रकारांना ५० लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वितरण शनिवारी परतूर येथे करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, जालना शहराध्यक्ष रवी दानम, जिल्हा कार्याध्यक्ष अहेमद नूर, परतूर तालुकाध्यक्ष भारत सवने आदींची उपस्थिती होती.
सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रकारितेची मूल्य कमी झाली अशी ओरड वरकरणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडियावरील माहितीला कुठलाही आधार नसल्याने आजही सर्वसामान्य माणूस अधिकृत माहितीसाठी प्रसार माध्यमांवरच विसंबलेला पाहायला मिळतो. प्रसार माध्यमांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे. प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना पाल्याचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, पत्रकारांना शासकीय सुविधा, यासह त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या घर परिवाराला मदत होईल या हेतूने अनेक उपक्रम, अनेक योजना भविष्यात संघटनेच्या माध्यमातून राबविल्या जाणार असल्याची माहिती  जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अजय देसाई यांनी केले. आभार आशीष गारकर यांनी मानले. यावेळी परतूर आष्टी तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.
 
परतूर पत्रकारांचा ५० लाख रूपयाच्या अपघात विमा संरक्षण
व्हॉईस ऑफ मीडिया परतूर पत्रकार संघटनेच्या वतीने परतूर तालुक्यातील पत्रकारांचा ५० लाख रूपयाच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वाटप करण्यात आले. तालुकाध्यक्ष भारत सवने सरचिटणीस सागर काजळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाचे व्हाईस ऑफ मीडियाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी या कार्याचे कौतुक करून पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती