११०० मुलींचे कन्यादान लग्न केले त्यातूनच मंगल कार्यालय उभारण्याची संकल्पना मिळाली - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,अन्नपूर्णा लॉन्स च्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच विवाह सोहळ्याचे पुण्य पदरात पडेल- लोणीकर



प्रतिनिधी समाधान खरात
माझ्या ३५-४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह गोरगरिबांच्या अकराशे पेक्षा अधिक मुलींचे कन्यादान लग्न केले असून या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातूनच मंगल कार्यालय उभारण्याची संकल्पना मनात आली व्यवसायाबरोबरच विवाह सोहळ्याचे पुण्य प्राप्त होईल असे मनात आले म्हणूनच इतर कोणताही व्यवसाय निवडण्यापेक्षा मंगल कार्यालय हा व्यवसाय निवडण्यात चा निर्णय आम्ही घेतला असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

परभणी येथे अन्नपूर्णा लॉन्स नावाने भव्य असे मंगल कार्यालय माजी मंत्री आमदार लोणीकर यांचा सहप्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वास्तुशांतीसह उद्घाटन सोहळा संपन्न झाला आमदार लोणीकर यांच्या आई अन्नपूर्णा दत्तात्रय नाना लोणीकर यांच्या नावाने अन्नपूर्णा लान्स असे नामकरण करत या मंगल कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे

मंत्री पदाच्या कार्यकाळात दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी गोरगरिबांच्या अकराशे पेक्षा अधिक सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न करण्याचे भाग्य मला लागले असून हिंदू धर्म पद्धतीसह सर्वधर्मीय पद्धतीने विविध जाती धर्मातील मुला मुलींचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपण केले असून त्याच संकल्पनेतून साकार झालेले अन्नपूर्णा लॉन्स हे सुसज्ज असे मंगल कार्यालय परभणीकरांच्या सेवेत दाखल झाले आहे

२००० पेक्षा अधिक खुर्च्या बसतील असा विवाह हॉल, वातानुकूलित हॉल, सुसज्ज इमारत, सुसज्ज डायनिंग हॉल, ३००० पेक्षा अधिक खुर्च्या बसतील एवढे लॉन्स भरपूर पार्किंग असे या अन्नपूर्णा लॉन्स चे वैशिष्ट्य असून परभणी शहरांमध्ये अशा लॉन्स नितांत गरज होती अशी भावना उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या अनेकांनी यावेळी व्यक्त केली माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर, श्रीजय लोणीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आमदार रत्नाकर गुट्टे माजी आमदार सुरेश देशमुख भाजपा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे ज्येष्ठ नेते विजयराव वरपूडकर डॉ संजय रोडगे जालन्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती घनश्याम शेठ गोयल वीरेंद्र धोका अंकुशराव बोराडे गणेश दादा रोकडे लक्ष्मणराव रोकडे सतीशराव निर्वळ यांनी मनोगत व्यक्त करून नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप गोरे रमेश भापकर संजय तौर गणेशराव खवणे माऊली शेजुळ जिजाबाई जाधव विलास आकात बाबुराव शहाणे राजेश वट्टमवार राजेश देशमुख शिवहरी खिस्ते परसराम यादव प्रकाश टकले विक्रम उफाड विकास पालवे प्रल्हादराव बोराडे रामदास पवार सुरेश भुमरे गजानन रोकडे पंजाबराव बोराडे हरिराम माने शहाजीराक्षी सुदाम प्रधान विठ्ठलराव काळे मुस्तफा पठाण प्रसादराव बोराडे भगवानराव मोरे दया महाराज काटे संदीप बाहेकर विलास घोडके ज्ञानेश्वर गोंडगे रामप्रसाद थोरात रवी सोळंके तुकाराम सोळंके सिद्धेश्वर सोळंके बाबाराव थोरात गजानन लोणीकर प्रदीप ढवळे बंकटराव सोळंके रंगनाथ येवले शिवाजी पाईकराव संभाजी वारे पद्माकर कवडे गजानन देशमुख नवनाथ चट्टे आनंद जाधव कैलास चव्हाण राजेभाऊ खराबे सोपान खरात रामकिसन मुसळे संतोष बोराडे गणेश चव्हाळ सोपान वायाळ राजेभाऊ नरवडे अभिनय चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती