दैठना खुर्द येथे देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

परतूर --प्रतिनिधी कैलाश चव्हाण
   तालुक्यातील दैठना खुर्द येथे फाट्यावर पत्राच्या शेडमध्ये अवैध देशी दारूची चोरटी विक्री करतांना आष्टी पोलिसांनी छापा मारून एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     संशयित हामद चाऊस अब्बु चाऊस रा. दैठना खुर्द याने दि 13 मे रोजी रात्री साडे नऊ वाजता दैठणा फाटा येथे टीनपत्र्याचेशेड मध्ये चार हजार आठशे रुपये किंमतीच्या देशी दारुच्या 48 बाटल्या संशयित आरोपीने विनापरवाना बेकायदेशिर रित्या प्रोव्हिएशन गुन्ह्याचा माल देशी दारू चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगतांना मिळुन आला. या प्रकरणी पोकॉ सज्जन काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनी भीमराव मुंढे हे करीत आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके माहिती देताना म्हणाले की आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. चोरटी देशी दारू विक्री होत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.*

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान