पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

तळणी : प्रतिनीधी रवी पाटील 
   ग्रामपंचायत कार्यालय तळणीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्याने ग्रामपंचायत स्तरावरील महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२३ -२४ चा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने श्रीमती पार्वतीबाई महादेव मुदळकर व श्रीमती मालताबाई आत्माराम आडळकर यांना गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित तळणीचे सरपंच गौतम भाऊ सदावर्ते उपसरपंच विश्वनाथसिग चंदेल माजी पं.स.सदस्य दत्तराव कांगणे सर्व सदस्य, ग्रा.पं.कर्मचारी ग्रामस्थ सर्व अंगणवाडी सेविका व महिला उपस्थित होत्या.सदरिल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सरकटे यांनी केले तर आभारप्रदर्शन सरपंच गौतम भाऊ सदावर्ते यांनी मानले.

यावेळी मनोगत व्यक्त करतानी सदावर्ते म्हणाले की अहिल्या देवी होळकर याचे स्वांतत्र्यपूर्व काळात भारतीयांसाठीचे मोठे योगदान आहे कठीण काळातील त्याचा सघर्ष सर्व भारतीयांसाठी व विशेष करून माता बघिनी साठी एक आदर्श घेण्यासारखा आहे त्याग पराक्रमाची पराकाष्ठा काय असते हे अहिल्यादेवी कंडून आपण शिकले पाहीजे अनेक मंदीरांचा जीर्णाद्धार त्याच्याच कार्यकाळात झाला आजतागायत ती मंदीरे उभी आहेत अहिल्यादेवी याचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायक इतिहास असल्याचे सरपंच गौतम सदावर्ते यानी शेवटी सांगीतले

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत