तळणीसह परिसरात पाऊस नसल्याने पेरणी पूर्णपणे थांबली

तळणी, ता. प्रतिनिधि रवी पाटील 
   मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात पाऊस नसल्याने पेरणी पूर्णपणे थांबली आहे.हजारो हेक्टर जमीन ही आजही पेरणीविना आहे. शेतकरी कृत्रीम पाऊस पाडण्याची मागणी करीत आहेत.परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. मृग नक्षत्रासह आर्द्र नक्षत्र कोरडे जात आहे.वातावरणात केवळ ढगांची गर्दी दिसुन येत आहे. सोसाट्याचा वारा व ढगाळ वातावरण निर्माण होत आहे परंतु पाऊस येत नाही त्यामुळे पेरणी पुर्णपणे खोळंबली आहे. खरीप हंगामातील कापुस,तुर,सोयाबीन, ऊडीद,मुग,मका आदि पीकांची पेरणी झाली नाही.उशीराने होणाऱ्या पेरणीला अपेक्षीत ऊत्यादन होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक घडी विस्कटणार आहे .पेरणीची पुर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली .बी बीयाणे सह खतांची खरेदी केली यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उधारी ऊसनवारी केली. आधीच कर्ज बाजारी असलेल्या शेतकऱ्यांना ऊशिरा पेरणीचा फटका बसणार आहे . मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीकाचे खुप मोठे नुकसान झाले होते . परतीच्या पावसाने झालेले नुकसान खुप होते परंतु आता पेरणी होत नाही .

थोड्या फार पडलेल्या पावसावर काही शेतकर्यानी पेरणी केली खरी पण त्या पेरणीवर पावसाने दडी मारली काही शेतकर्याची उगवण शक्ती कमी झाली तर काही शेतकर्यानी तुषार द्वारे पाणी देऊन पिक जगवण्याचा सघर्ष चालू केला आहे तळणी कृषी मंडळातील सर्वच गावामध्ये ही परीस्थीती असल्याने या परीसरातील शेतकर्यावर दुबार पेरणीचे सकंट ओढवते की काय अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहे फार झाले तर अजुन दोन ते तीन दिवस पिके तग धरू शकतील अशी परीस्थीती आहे तळणी परीसरातील बंहुंताश शेतकर्याची पेरणीला आधीच झालेला विलबं व पावसाने मारलेली दडी शेतकर्याच्या मुळावर आहे खरीपातील सर्वच पिकांची वाढ खुटली आहे ज्या शेतकर्याकडे पाणी देण्याची साधने उपलब्ध जरी असली तरी विहीरीमध्ये पुरेसे पाणी नाही पिकांची तहान आहे त्या पाण्यावर निभावणे अशक्य आहे 

पावसाच्या या विलबामुळे जनावाराच्या चाऱ्याचा प्रश्न माञ दिवसेन दिवस बिकट होत आहे बऱ्याच शेतकर्याकडे पशुधन आहे शिवाय दुधाळ जनावरे आहेत चाऱ्याची काटकसर करून जनावाराना देण्याचे चिञ सध्या तळणी परिसरात दिसत आहे नातेवाईक व प्रेमाच्या लोकांकडून चारा उपलब्ध होतो का याची विचारपूस सध्या पशुपालक करत आहे पावसाळा सुरू होऊन दीड महीना होत आला तरी सुध्दा अजुन पर्यन्त तळणी मंडळात एकही मोठा पाऊस झाला नाही थोड्याच पावसार पेरणी उरकून घेतल्याने आता शेतकरी मनस्ताप करत आहे
 
तळणी पासून काहीच अंतरावर विदर्भाची सीमा लागते त्या परिसरात माञ चांगला पाऊस असल्याने पिकांची वाढ चांगली असल्याचे चिञ आहे

तळणी कृषी मंडळाचे एकुण ( गतवर्षीचे) भौगोलीक क्षेञ एकुण १६२५६ हेक्टर असून पेरणीलायक क्षेञ १४६६७ आहे तर १४०६७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी गतवर्षी ७१६६ हेक्टर वर सोयाबीणचा पेरा झाला होता या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे पूर्ण पेरणी झाली नसल्याने या वर्षीची आकडे बारी कृषी विभागाकडे उपलब्ध झाली नाही 

तळणी परीसरातील बऱ्याच शेतकर्यानी थोडयाच पावसावर पेरणी केली या वर्षी मोठा फटका बसण्याचे चिन्ह दिसत आहे गतवर्षी अतीवृष्टी चा फटका व या वर्षी पाऊस नसल्याचा फटका शेतकर्याना बसला आहे

मंगलसिह चव्हाण शेतकरी तळणी


या वर्षी आधीच पेरणीला विलंब झाला पेरणी केली तर ऐन उगवण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली कपाशीचे नियोजन बदलून सोयाबीण पेरली खरी पण पाऊस नसल्याने उगवण शक्ती कमी झाली 

अशोक वाघ शेतकरी तळणी


पावसाने ओढ दिल्यान चारा तयार झाला नाही ओला चार्यासाठी पाणी कमी पडत आहे चार्याना पाणी द्याव की पिकाला पेरलेले पिक जगवणे गरजेचे असल्याने दुधाच्या जनावाराची संख्या कमी करुन टाकली 

अक्षय सुरुसे दुध उत्पादक शेतकरी तळणी

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण