९०% च्या पुढे ४ तर विशेष प्राविण्यासह २३ विद्यार्थी उत्तीर्ण शास्त्री विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची दहावी निकालाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम असून नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ४ विद्यार्थ्यांनी ९०% च्या पुढे गुण मिळविले आहेत तर २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
    छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १० वी ) या विद्यालयातून एकूण २१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल ८८.६७ टक्के एवढा लागला असून विद्यालयाचे ४ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम आहे.
   पृथ्वीराज कोरके, प्रीती बोबडे, जयश्री सोळुंके व रिंकल सवणे यांनी उज्वल यश मिळविले.
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात, सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, मुख्याध्यापक एल. के. बिरादार, उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे,पर्यवेक्षक आर. टी. राऊत, टी. जी. घुगे यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड