आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याने परतूर पोलिसांचा गौरव


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   शहरात धाडसी घरफोडी करून  खळबळ माजवणाऱ्या आरोपींना परतूर पोलीसांनी चोवीस तासाच्या आत पकडुन मुसक्या आवळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परतूर पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव केला आहे.

परतूर येथे काही दिवसापूर्वी राजेश काकडे आणि दिनेश होलानी या दोन ठिकाणी घरात घुसून धाडशी आंतरराष्ट्रीय चोरट्यांनी चोरी अज्ञात आरोपीने केली होती. त्यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण पसरली होते. यातील चोरांचा मागोवा घेऊन परतूर पोलिसांनी सराईत आणि खुंकार आरोपीस तात्काळ अटक केली. सदरच्या आरोपी मुंबई, ठाणे आणि बांगलादेश येथील आंतरराष्ट्रीय टोळीतील होते त्यांच्यावर मुंबई, भुसावळ, तेलंगणा, निजामाबाद, हैदराबाद, अमदाबाद, पश्चिम बंगाल हावडा, वर्धमान येथे असे एकूण 53 गुन्हे नोंद झालेले उघडकीस आणले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे  पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी परतूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एम.टी सुरवसे, यांच्यासह पोउपनि विठ्ठल केंद्रे, पोना अशोक गाढवे, पोका अचुत चव्हाण, पोका दीपक आडे, पोका ज्ञानेश्वर वाघ, पोका दशरथ गोपनवाड, पोका परमेश्वर माने यांना प्रशस्तीपत्र देऊन देऊन गौरविण्यात आले आहे. 

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत