परमार्थात कष्ट करा; परमात्म्याचा पैसा घेऊ नका – ह.भ.प. राजेंद्र महाराज चोरडीया ,तळणी येथे तीन दिवसीय कीर्तन सोहळ्यात काल्याच्या कीर्तनातून परखड उपदेश
तळणी प्रतिनीधी रवि पाटील परमार्थ क्षेत्रात काम करा, कष्ट करा, धंदा–व्यवसाय, दुकानदारी करा; पण पोटासाठी श्रम करताना परमात्म्याचा पैसा घेऊ नका, असा परखड आणि अंतर्मुख करणारा उपदेश ह.भ.प. राजेंद्र महाराज चोरडीया यांनी दिला. तळणी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आयोजित तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी त्यांनी आजच्या वारकरी संप्रदायातील प्रवृत्तीवर चिंतन मांडले. आज वारकरी, टाळकरी ते कीर्तनकारांपर्यंत परमार्थाच्या नावाखाली परमात्म्याचा पैसा घेतला जातो; हे कोणाच्या ध्यानात आहे का, कोणी यावर बोलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, निष्काम कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, असे महाराजांनी स्पष्ट केले. निष्काम भावाने सेवा केली, तरच मन शुद्ध होते आणि जीवन मुक्तीकडे वाटचाल होते, असे त्यांनी सांगितले. सावध सेवा आणि अपेक्षाहीन भक्तीच प्रगतीचा मार्ग जीवाचे कर्तव्य आहे की सावध राहून परमार्थ करावा, सावध राहून देवाची सेवा करावी आणि अपेक्षाहीन भावाने सेवा करावी. जोपर्यंत अपेक्षाहीन सेवा केली जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही, असे ...