मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार, प्रसंगी विधानसभा विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन*=============*सरकार मध्ये आपापसात ताळमेळ नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार दळभद्री- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात*=============*परभणीसह मराठवाड्यातील शेती अतिवृष्टीमुळे उध्वस्थ, सरकारने तात्काळ मदत करण्याची आवश्यकता*============ *कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल- लोणीकर*


=============

परभणि (प्रतीनिधी)

परभणी सह  संपूर्ण मराठवाड्यामध्ये 90 टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून मराठवाड्यात पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे असे असताना देखील इंग्रजांच्या काळातील नजर आणेवारी नुसार 55 टक्के पेक्षा अधिक आणेवारी दाखवून राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करायचाच नाही की काय असा प्रश्न पडू लागला आहे परंतु येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाबाबत सरकारला नक्की जाब विचारू, प्रसंगी देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात विधानसभा व प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात विधानपरिषदेचे कामकाज भारतीय जनता पार्टीचे शिलेदार चालू देणार नाहीत अशा शब्दात लोणीकर यांनी विद्यमान सरकारचा समाचार घेतला.

परभणी येथे पाहिजे शेतकरी संवाद बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे माजी आमदार विजयराव गव्हाणे माजी आमदार रामदास वडकुते भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम  परभणी शहर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे आमदार मेघना बोर्डीकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे भाजपा किसान मोर्चाचे मराठवाडा प्रमुख अजय गव्हाणे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक रमेश पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती

हे सरकार दळभद्री सरकार असून सरकारमधील मंत्री यांचा आपसात ताळमेळ नाही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे व एकमेकांवर कुरघोडी करणे व शेवटी काहीही झाले तरी लाचारी पत्करणे व आपली सांभाळणे एवढाच एककलमी कार्यक्रम या सरकारने चालवला असून शेतकऱ्यांनी या लोकांना कसलेही देणेघेणे नाही त्यामुळे शिशूपालाचा चे ज्या पद्धतीने शंभर अपराध भरल्यानंतर त्याचा अविनाश झाला अगदी तसेच या सरकारचे देखील होईल हे सरकार त्यांच्या ओझ्याने जाईल असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले

मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक कापणी प्रयोग करावा लागेल त्यानुसार झालेले पिकांचे नुकसान लक्षात घेऊन तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करणे अपेक्षित आहे परंतु हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अजून तरी गंभीर नाही त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा लागेल असंही यावेळी लोणीकर म्हणाले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या असून त्या पूर्णत्वास नेल्या आहेत कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे देखील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना हव्या त्या ठिकाणी विकत घेण्याचे स्वातंत्र्य केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मुळे शेतकऱ्यांना मिळाले आहे ही बाद खरेतर प्रशंसनीय आहे विरोधकांनी देखील त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणे अपेक्षित आहे परंतु तसे न करता शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध हाच त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे त्यांचे शेतकऱ्यांविषयी चे प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हाताळला असून माननीय उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून दाखवले परंतु विद्यमान सरकारला चांगले वकील देणे किंवा माहिती पुरवणे यासारख्या बाबी सुद्धा करता आल्या नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून मराठा आरक्षणाला माननीय सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली त्यासाठी पूर्णपणे महा विकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या मागणी पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद तत्कालीन सरकारने केली होती या सरकारने मात्र या सर्व बाबींना केराची टोपली दाखवली आहे असेच म्हणावे लागेल असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

यावेळी बालाप्रसाद मंडळा सुजितसिंह ठाकूर प्रमोद वाकुडकर चंद्रकांत डहाळे लिंबाजी भोसले सुभाष आंबट शामराव पवार गणेश काजळे अभिजीत रोडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती