नवराञातच परतुरात वीज पाण्याचे वांदे..? 8 दिवसापासून निर्जळी; परतूर पालिकेचा भोंगळ कारभार



                                                                              

परतूर(प्रतिनिधी)
शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून नगरपालिका व वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चालला असून हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे असलेला नवरात्र दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसापासून परतूर शहरामध्ये मोंढाभागातील अनेक काॅलनीत दुरूस्तीच्या नावाखाली पुर्वकल्पना न देता व पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने ऐन नवराञातच शहराचा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकात व महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.तसेच पालिकेच्या कुपनलिका बंद व नादुरुस्त असल्याने तसेच,टँकरने सुध्दा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत,पालिकेने पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते पण पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ते सुध्दा करणे झाले नाही यामुळे शहरातील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत.अगोदरच कोरोना महामारीची भीतीचा प्रकोप त्यात हिंदू सणांमध्ये घरातील साफसफाई यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना व महिलांना नवराञाचा नऊ दिवसाचा उपवास असुन सुध्दा गल्लोगल्ली भांडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. महिन्यातून केवळ पाच ते सहा वेळाच अस्वच्छ व गढुळ तसेच दुषित पाणी येणे हे नित्याचेच झाले आहे.याशिवाय नेहमीच मोटार मध्ये बिघाड किंवा कुठे पाईप फुटणे या कारणावरून आठ आठ दिवसापर्यंत नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागते .पालिकेचा एकही कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनीधी पाण्याविषयी बोलायला तयार नाही. शहरातील नागरिक व महिला नवराञात मात्र हातामध्ये भांडे घेऊन गल्लीबोळात पाण्याच्या शोधात फिरताना दिसतात. ऐन सणासुदीत विज पाण्याविना नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अगोदरच पालिका प्रशासनावर स्वच्छता, आरोग्य विषयक प्रश्न,रस्ते,भुमिगत गटारामुळे शहरातील रस्त्याची झालेल्या चाळणीमुळे नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती