मुख्याध्यापकाची चौकशी गुलदस्त्यात जिल्हाधिकार्याचे शिक्षण विभागाला चौकशीचे पञ , शिक्षण समीती सह ग्रामस्थ करणार उपोषणतळणी : तळणी ता मंठा येथील जि प प्रशालेचे मुख्याध्यापक एल डी चव्हाण यांनी भ्रष्ट्राचार केल्या प्रकरणी  त्याची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकर्याना शिक्षण समिती अध्यक्ष्याच्या वतीने देण्यात आले होते तळणी या शाळेमधील मुंलांच्या पोषण आहारामधील अनियमीतत्ता बांधकामामधील गैरव्यवहार गणवेश वाटप इत्यादी प्रकरणाची चौकशी करण्याचे पञ जिल्हा शिक्षणाधिकारी  शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद जालना याना दिले असले तरी या प्रकरणाची कुठलीच चौकशी होत नसल्याने शिक्षण समिती व ग्रामस्थ दसरा झाल्यानंतर उपोषण करणार आहेत 

शेकडो विद्यार्थी वंचीत 
गेल्या पंधरा ते विस दिवसापासून चालू असलेल्या या वादामुळे शाळेमध्ये विद्यार्थाचा पोषण आहार तसाच पडून असुन शेकडो विद्यार्थी या पोषण आहारापासुन वंचित असुन त्या पोषण आहाराची गुणवत्ता खराब होण्याची भिती आहे हे या आधी सुध्दा मुख्याध्यापक एल डी चव्हाण याच्या विरोधात ग्रामस्थानी अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा शिक्षण विभागाने त्याच्या विरोधात कुठलीच कारवाई केली नाही शिक्षण समिती अध्यक्ष संतोष सरकटे यानी एक महिन्यापूर्वी निवेदन देऊन सुध्दा या प्रकरणाची चौकशी होत नाही

या प्रकरणात मुख्याध्यापक दोषी असेल तर कारवाई झालीच पाहीजे पंरतू त्यानी ईतर कोणासाठी जर हा भष्ट्राचार केला असेल तर त्याच्यावर सुध्दा कारवाई झाली पाहिजे या सर्व प्रकरणामुळे गरीब विद्यार्थाना विनाकारण पोषण आहारापासुन वचिंत राहावे लागत आहे 
कैलास सरकटे जिल्हा उपाध्यक्ष्य राष्ट्रवादी 

निवेदन देऊन सुध्दा चौकशी होत नाही भष्ट्राचार करून सुध्दा काही राजकीय मंडळी मुख्याध्यापकास पाठीशी घालत असल्याचा आरोप शिक्षण समिती अध्यक्ष्य संतोष सरकटे यानी केला दसरा झाल्यावर शाळेतच उपोषण करणार असल्याचे त्यानी सांगीतले 

बीओ केद्र प्रमुख नॉंट रिचेबल 
या प्रकरणाची पारदर्शक पध्दतीने चौकशी व्हावी यासाठी शिक्षण समीती व ग्रामस्थ सतत सपर्क करण्याचा प्रयत्न करत असुन प्रत्येक वेळेस हे जबाबदार अधिकारी नॉंट रिचेबलच असतात

जिल्हाधिकर्याचे पञ
शिक्षण समितीने निवेदन दिल्यानंतर त्या प्रकरणातील निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व सबधीतांवर कारवाई .करण्यात यावी अशा आशयाचे पञ जिल्हाधिकार्यालयाकडून शिक्षण विभागास देण्यात आले आहे ग्रामस्थाने  दिलेल्या तक्रारीचे आपल्या कार्यालयाकडून चौकशी करुन तक्रार दारास उत्तर देण्याचे या पत्रात सागण्यात आले तसेच जसे हे प्रकरण ग्रामस्थानी उघडकीस केल्या नंतर या प्रकरणाची चौकशी साठी तळणी केद्र प्रमुख एस यु वाघ व केद्रप्रमुख कांबळे याची नियुक्ती करण्यात आली होती पंरतू शिक्षण समितीने निवेदन दिल्यापासुन कुठलेच अधिकारी या चौकशी साठी आले नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान