युवा मोर्चाची मराठवाड्यामध्ये मोठी ताकद पदवीधर मतदारसंघात भाजपा चा उमेदवार निवडून अणन्या साठी पूर्ण शक्ती लावणार- प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


नांदेड(प्रतिनिधी)
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष ,आणि शेवटी मी, ही विचारधारा घेऊन चालणारा भारतीय जनता पार्टी हा भारतीय राष्ट्रीयत्व  मानणारा पक्ष असून येत्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी युवा मोर्चा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले.
      पदवीधर मतदार संघाच्या नांदेड ग्रामीणच्या अर्धापूर जि नांदेड येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते
   या वेळी व्यासपीठावर खा प्रताप पाटील चिखलीकर,भा ज पा विभागीय संघटन मंत्री संजयजी कोंडगे, भा ज पा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख ,ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव इंगोले, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेभाऊ देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .
       पुढे बोलताना महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की दोन, तीन निवडणुका अगोदर मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता जयसिंगराव काका गायकवाड ,श्रीकांतजी जोशी आदी मान्यवरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा पुन्हा एकदा या मतदारसंघाचा पदवीधर मतदार संघाचा आमदार भारतीय जनता पार्टी चा केल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले .
मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची व युवा मोर्चा ची पाळेमुळे खोलवर रुजलेली असून आपण सर्वजण सर्व शक्ती एकवटून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले .
      पुढे ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला, घराणे खानदान न पाहता  जाती-धर्म च्या पलीकडे जाऊन संधी दिली जाते त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाला संधीसाठी काम करण्याची ही वेळ असून आपल्या कामाच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती