जवळा येथील कृषीदूतांकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन


परतुर : येथुन जवळ असलेल्या जवळा येथील शेतकऱ्याना  वंसतराव  नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सेलू येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी जवळा (ता.परतूर)  येथील  शेतकऱ्यांना शेतीविषयी विविध योजना, कामांची माहिती दिली . ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत  कृषिदूत योगेश राजबिंडे यांनी बिज प्रक्रिया, बिज उगवण क्षमता चाचणी, निंबोळी अर्क तयार करणे,कलम तयार करणे, तण व्यावस्थापन, आदी  विविध विषयांवर  प्रात्याक्षिकांसह माहिती दिली .  यावेळी समस्त गावातील शेतकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार