Posts

Showing posts from April, 2026

तळणीतील हिंदू संमेलनात एकतेचा जागर— “हिंदू समाज एकत्र आला तरच संकटे नाहीशी होतील” ह भ प गजानन महाराज सपकाळ यांचे प्रतिपादन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  आज आपल्या भारतमातेवर विविध प्रकारचे प्रहार होत असून ती पूर्णतः सुरक्षित नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विदर्भ प्रांत धर्मजागरण सांस्कृतिकचे ह.भ.प. गजानन महाराज सपकाळ यांनी केले. २०१४ नंतर हिंदुत्वाचा उदय दिसून येत असला तरी हिंदू धर्मावरील संकटे पूर्णपणे संपलेली नसून ती केवळ पुढे ढकलली गेली आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही संकटे पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, त्यासाठी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या पाठीवर असलेल्या या हिंदू राष्ट्रावर अनेकांनी आघात केले, तरीही “अनेकतेत एकता” या तत्त्वामुळे भारत आजही ताठ मानेने उभा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. सनातन वैदिक हिंदू धर्माची संस्कृती ही जगासाठी आदर्श असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या भगव्या परंपरेची पताका अखंड तेवत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती गाडून “आपण हिंदू आहोत” ही भावना...

मंठा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भव्य हिंदू संमेलन; एकतेचा, स्वदेशीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेशभव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले; प्रमुख वक्ते संजय राव तालखेडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन

Image
मंठा प्रतिनिधी रवी पाटील   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंठा शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात आकर्षक व उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचे दर्शन घडवले. संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून संजय राव तालखेडकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि सध्याच्या काळातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. “हिंदू संस्कृती ही अनादिकालापासून टिकून राहिलेली असून सततच्या आक्रमणांनंतरही ती अधिक सक्षम झाली आहे. जगाला शांततेचा संदेश देण्याचा अधिकार हिंदू समाजालाच आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात हिंदू समाजाने जाती-पातीच्या भिंती ओलांडून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.” स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी केलेली भविष्यवाणी आज साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. परमेश्वरप्राप्तीचा अधिकार सर्वांना समान आहे, ही हिंदू धर्मा...

स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश, दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   तळणी येथून जवळच असलेल्या दूधा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात डॉक्टर प्रमोद आ कात यांनी मार्गदर्शन केले हिंदू समाजाने आपल्या मूळ संस्कृतीची आणि ओळखीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादित केले संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करून संघटनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कोणत्याही समाजाचे संघटन करण्यासाठी त्या समाजाला स्वतःची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे मी कोण आहे माझी संस्कृती काय माझा इतिहास कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय खरी संघटन होऊ शकत नाही समाज परिवर्तन हे एकट्याची काम नसून संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच ते शक्य होते असे यासाठी आपल्यात समन्वय असणे गरजेचे आहे   इतिहासाचा संदर्भ देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या जीवनातून संघटन आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जोडलेला प्रत्येक मावळा हा हिंदवी स्वराज्याचे भगवे तोरण डोलाने सतत फडकत राहावे यासाठी त्यांनी संघर्ष केला प्रभू श्रीराम आणि प्...