Posts

Showing posts from May, 2026

विवेकानंद सेवा केंद्राचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे , यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विवेकानंद सेवा केंद्र परतुर संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर, विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर, विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा परतुर, विवेकानंद इंग्लिश स्कूल केंधळी मंठा, अशा 4 शाळेचे एकूण 42 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये,विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. या परीक्षेमध्ये एकूण 42विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व शिक्षकांचे परिश्रम यामुळे हे यश मिळाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.जी.बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक आदरणीय संदीप दादा बाहेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. शिंदे मॅडम, प्रिन्सिपल महाजन सर, दंदा...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., च्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती साठी पात्र.

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., इयत्ता आठवीच्या च्या दोन विद्यार्थीनी रुचिता अमर नवल आणि कार्तिकी मुक्तिराम धुमाळ 2026 यावर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तम गुण संपादन करून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरल्या आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थिनींना संस्था अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्रिन्सिपल गोविंद पाठक, वाईस प्रिन्सिपल पूजा मोरे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी विद्यार्थीनीना शुभेच्छा देउन कौतुकाची थाप दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.